Pm Narendra Modi | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्र राजकीय सभांना वेग आले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची पहिली सभा धुळे येथे पार पडली असून त्यांचा ताफा नाशिककडे वळला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “आज प्रचारासाठी मला नाशिकच्या पुण्यभूमीवर येण्याचे पुण्य लाभले याचा आनंद आहे” अस म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली.
सरकार आल्यास पीएम किसानची वार्षिक रक्कम 15 हजार करणार
“डबल इंजिन सरकारने विकासाला गती आणली आहे. महायुती आहे तर गती आहे, प्रगती आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती. महायुती सरकार गरिबांची चिंता करणाऱ्या सरकार आहे. देश नवीन रेकॉर्ड बनवत आहे. आपले सरकार आल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून दर वर्षी 12 हजारांची मदत वाढवून 15 हजार करण्यात येणार आहे. भारताच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राचे पुढे जाणे फार महत्त्वाचे आहे.” असे म्हटले.
काँग्रेस जातीपातीचे राजकारण करते आहे
पुढे बोलत, “महाविकास आघाडीने महाराष्ट्राची प्रगती होऊ दिली नाही. समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पाचे काम रखडवले. मोठे काम सुरू झाले की मविआ विरोध करते. जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान नव्हते ते आम्ही 370 कलम हटवून लागू केले. माझी ही बाबासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ते बाबासाहेबांचे संविधान हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या कारस्थानात मविआसुद्धा सामील आहे. काँग्रेसचे संविधान आदिवासी विरोधात आहे. काँग्रेसने ओबीसीला कधीही एकजूट होऊ दिले नाही. काँग्रेसला ओबीसीतील एकजुटता संपवायची आहे. ओबीसीला विभागून काँग्रेसला सत्ता स्थापन करायची आहे.” अस म्हणत कॉंग्रेसवर निशाणा साधला.
PM Modi In Nashik | आमच्या काळात सर्वाधिक कांदा निर्यात; माझे शेतकरी मला विसरणार नाही
महाविकास आघाडीपासून महिलांनी सांभाळून रहा
“महाविकास आघाडी महाराष्ट्रातील महिलांचे सर्वात मोठे दुश्मन आहेत. आपल्या माता भगिनींना या योजनेचा लाभ होत आहे. परंतु महाविकास आघाडीच्या लोकांना याचा त्रास होत असून हे लोक या विरोधात कोर्टापर्यंत गेले आहेत. त्यामुळे यांच्यापासून महिलांना सावध राहण्याची गरज आहे. भाजप आणि महायुती सरकार महिलांच्या सन्मान आणि प्रगतीसाठी समर्पित असून आम्ही तीन करोड बहिणींना लखपती दिदी बनवले आहे. महिला आज देशाच्या प्रगतीत सक्रिय भूमिका बजावत आहेत. आज गरिबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून हक्काचं घर मिळाला आहे. मी या देशातील प्रत्येक गरिबाला हक्काचा घर देण्याचा ठराव केला आहे.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम