दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मिशन चिता’ अंतर्गत देशात तब्बल ७० वर्षांनी चित्त्यांचे दर्शन घडवत देशवासियांना आपल्या वाढदिवसानिमित्त एक अनोखे रिटर्न गिफ्ट दिले आहे.
१६ तासांच्या दीर्घ प्रवासानंतर आज सकाळी नामिबियाहून हे ८ चित्ते ग्वालेरला दाखल झाले. त्यानंतर त्या ८ चित्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. ह्या आठ चित्त्यांमध्ये ४ मादी आणि ३ नर चित्ते आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी चित्त्यांचे फोटोदेखील काढले होते.
PM Modi releases 8 cheetahs in MP's Kuno National Park
Read @ANI Story | https://t.co/NVlXzeiKWp#CheetahIsBack #Cheetahs #NarendraModi #PMModi pic.twitter.com/vmUMwm4yHm
— ANI Digital (@ani_digital) September 17, 2022
आधी ह्या आठ चित्त्यांना घेऊन येणारे विमान जयपूरमध्ये उतरणार होते. परंतु तांत्रिक कारणांमुळे ही विमान जयपूरऐवजी थेट ग्वाल्हेरमध्ये विमानाचं लॅंडिंग करण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले नामिबियन चित्ते अखेर भारतात दाखल झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले आहे.
हा ‘मिशन चित्ता’ मधील एक भाग असून ज्यात १६ चित्त्यांना देशात आणण्याची योजना आहे. यापूर्वी १९५२ मध्ये देशात चित्ता लुप्त झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी १९७० चित्ते भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर तब्बल ७० वर्षांनी आज हे ८ चित्ते भारतात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम