delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुलढाणा अपघातातील मृतांच्या व जखमींच्या वारसांना केली मदत जाहीर……

0
70

Delhi : शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या ठिकाणी बसचा टायर फुटल्याने बसला आग लागून जवळपास 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांनी मृताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यातच आता केंद्र सरकारने देखील या अपघाताची दखल घेत मृताच्या वारसांना आणि अपघातात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

याबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताविषयी संवेदना व्यक्त केल्या ते म्हणाले की, महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातामुळे अतिशय दुःख झाले आहे. ज्यांनी या अपघातात आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. अपघातात जखमी झालेले लवकर बरे होवोत स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी द्वारे बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ एक्सप्रेस या खाजगी बसचा मध्यरात्री अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं, मृतांच्या कुटुंबीया प्रती संवेदना व्यक्त केला त्यांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपये तर केंद्र शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली. जखमींना केंद्र शासनाने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल आहे. मात्र हा अपघात सर्वांनाच व्यथीत करणारा असल्याचा सांगत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here