Petrol Breaking | पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांना फटका

0
23
Petrol-Diesel Rate
Petrol-Diesel Rate

Petrol Breaking | नवीन मोटार वाहन कायद्यात अपघातास ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार असून या कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच सात लाख रुपये दंड करण्यात येणार असल्याने नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असताना देशभरात विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले. तसेच नाशिकमधील मनमाड डेपोतून एकही टँकर बाहेर पडले नाही आणि यामुळे मनमाड डेपोतून इंधन वाहतूक ठप्प झाली आहे.

Pune | पैसे मागितल्याने बहिणीला मारहाण; बहिणीने उचलले टोकाचे पाऊल

लवकरात लवकर टँकर चालकांचा हा संप मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून संपामुळे मार्केटयार्ड मधील आवक कमी झालेली आहे. पुण्यातील मार्केटयार्डमध्ये गाड्यांची आवक कमी झाली असून 10 ते 20 टक्के गाड्या कमी झाल्या आहेत. ट्रक चालकांच्या संपाचा राज्यातील अनेक जिल्ह्यात एसटी बस सेवेवर परिणाम होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

यातच अमरावती जिल्ह्यातील एसटी डेपोमध्ये  पाच दिवस पुरेल एवढा डिझेलचा साठा उपलब्ध आहे. अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या  सर्व आगारातील पंपावर वर 80% डिझेलचा साठा उपलब्ध असून एसटीच्या प्रवाशांनी घाबरून जाऊ नये तसेच एसटीची सेवा नियमित सुरू राहणार असल्याची एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे.

Petrol Breaking | वाहनचालकांनो पेट्रोल-डिझेल आताच भरा नाहीतर…!

Petrol Breaking |  नाशिकमध्ये पेट्रोल-डिझेल पंपावर वाहन चालकांच्या रांगाच रांगा

ट्रक चालकांच्या संपाचा संपूर्ण देशात परिणाम होताना दिसत आहे. यातच मनमाडमध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या दीड हजार वाहनांची चाकं थांबली असून मनमाडमध्ये इंधन प्रकल्पाबाहेरच टँकर चालकांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनचालक उपस्थित आहेत.

नाशिक शहरात काल रात्रीपासूनच पेट्रोल-डिझेल पंपावर वाहन धारकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहेत. अनेक जण गाडीत तसेच बाटलीत आणि कॅनमध्ये पेट्रोल भरून साठवले जात आहे. तसेच जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पुरेल इतकाच इंधन साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत असून यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here