Manoj Jarange | ‘मनोज’ नावाच्या व्यक्तींना मिळणार मोफत जेवण…

0
35

Manoj Jarange |  मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. जरांगे यांच्या ह्या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मनोज जरांगेंवर असलेल्या प्रेमापोटी एका मराठा बांधवाने एक अनोखा उपक्रम सुरू केला असून याची आता सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.

Nashik News | आणखी एक अधिकारी लढवणार देवळालीतून निवडणूक

 

 कुठे आहे हे हॉटेल?

धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे हे अमृत हॉटेल आहे. हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी जरांगेंना समर्थन देण्यासाठी चक्क आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. भोजने यांच्या हॉटेलमध्ये ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवून २३ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जात होते. त्यात वाढ करून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत आता मोफत जेवण दिले जाणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here