बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घराणेशाहीबद्दल बोलताना मी जनतेच्या मनात असेल तर मला नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादळ उठले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीड येथे करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी वंशवादावरून बोलताना त्यांनी भलेही मी जनतेच्या मनात असले, तर मोदीजी काय, कोणीही माझे राजकारण संपवू शकत नाही. असे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी काँग्रेसमध्ये वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वंशवाद संपवत आहेत, असे म्हणत काही काळ थांबल्या. आणि मी देखील वंशवादाचे प्रतिक आहे. मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
तसेच त्या हेही म्हणाल्या, की आपल्याला राजकारणामध्ये वेगळेपण आणायचे आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. पण अलिकडचे राजकारण हे एक करमणुकीचे साधन होत आहे. हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नाही.
दरम्यान, हा व्हिडियो समोर आल्यानंतर भाजपने ह्यावर सारवासारव करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, की वंशवादाचे राजकारण कर्तृत्व नसताना मुलगा एखाद्या पदावर जातो. मोदीजी त्याच्या विरोधात आहे. मात्र यावर पंकजा मुंडे ह्या सविस्तर सांगू शकतील.
दरम्यान, गेल्या अनेक काळापासून पंकजा मुंडे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तशी नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. शिवाय आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे देखील त्या बोलत आल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी पंकजा यांना मोठी जबाबदारी दिली असली, तरी त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना त्यातच आता त्यांनी हे वक्तव्य केले. नेमके पंकजा यांच्या मनात काय सुरु आहे, याचे कोड अद्यापही कायम आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम