Info-tech news | २० हजारांच्या घवघवीत डिस्काउंटसह आताच ऑर्डर करा Google Pixel हा फोन

0
33

Info-tech news | जर तुम्ही देखील Google Pixel चा हा फोन खरेदी करू इच्छित असाल तर, हीच तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. कारण फ्लिपकार्ट वरून तुम्हाला हा फोन जबरदस्त डिस्काउंटसह अगदी कमी किंमतीत विकत घेता येणार आहे. सध्या Google Pixel 7 Pro ह्या फोनवर सर्वात मोठी सूट मिळणार आहे. मात्र, फोन खरेदी करण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.

Google Pixel 7 Pro वरील खास ऑफर

Google Pixel 7 Pro या फोनची किंमत ८४,९९९ रुपये इतकी आहे व तुम्ही हा फोन २२% डिस्काउंटसह फक्त ६५,९९९ इतक्या रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे. त्याबरोबरच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळणार आहेत. Axis Bank Credit Card EMI Transaction द्वारे पेमेंट केले तर १०% अतिरिक्त डिस्काउंटही मिळू शकतो. Flipkart Axis Bank Credit Card वरही अशी ऑफर मिळणार आहे.

Nashik Crime | बागलाणमध्ये घटस्फोट झालेला नसतानाही, महिलेने थाटात केला दुसरा विवाह

तसेच तुम्हाला Exchange Offer अंतर्गत हा फोन आणखी जास्त स्वस्त किंमतीत मिळू शकणार आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन हा फ्लिपकार्टवर एक्सचेंज केला तर, ४३ हजार रुपायांपर्यंतची घवघवीत सूटदेखील मिळवता येईल. पण, इतका डिस्काउंट मिळवण्यासाठी जुन्या फोनची कंडीशनही चांगली असावी लागेल. ही एक्सचेंज ऑफर नाही जरी मिळाली तरी एक जबरदस्त डील तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळणार आहे.

Google Pixel 7 Pro चे स्पेसिफिकेशन

Google Pixel 7 Pro हा स्मार्टफोन १२ जीबी रॅम व १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह बाजारात आलेला आहे. गुगलने यात स्वतः बनवलेल्या टेंसोर जी२ ह्या चिपसेटचा वापर केला आहे. सोबत टायटन सिक्योरिटी चिपही मिळते. ह्या फोनमध्ये ६.७ इंचाचा क्वॉड एचडी+डिस्प्लेही दिला जातो. यात ट्रिपल रियर कॅमेरा देखील दिलेला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा आहे. ह्या फोनमध्ये १०.८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही मिळत आहे. यात ४९२६ एमएएचची बॅटरीदेखील देण्यात आलेली आहे.

Info-tech news | फोनपेक्षाही स्वस्त किंमतीत जिओचा नवा लॅपटॉप


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here