Opposition leader : राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे आमदार संख्येच्या आधारे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी घेतला होता. याच निर्णयानुसार आता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आल आहे.
गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये रोजच नवीन ट्विस्ट घेत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी rashtravadi काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षांमध्ये उभी फूट पाडत बंड करून सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून देखील अजित पवार कार्यरत असल्यामुळे त्यांच्या बंडामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त झालो होत. यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी Opposition leader काँग्रेसच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली. मात्र आमदारांचा संख्याबळ कमी असल्याने विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
https://thepointnow.in/strike-against-pm-modi/
विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र आज प्रदीर्घ कालावधीनंतर विजय वडेट्टीवारvijay vadettiwar यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे वडेट्टीवार यांच्या रूपामध्ये राज्याला विधानसभेमध्ये नवीन विरोधी पक्ष नेता मिळाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक गट तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे सरकारमध्ये सामील झाले यानंतर विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटला असला तरी मात्र विरोधी पक्ष नेता नियुक्त न करण्यात आल्याने अनेक चर्चांना उधान आलं होतं. मात्र अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजय वडेट्टीवार यांच्या रूपामध्ये महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला आहे.Opposition leader
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम