Online Payment | UPI ऑटो पेमेंट लिमिट आता १५ हजारांवरून थेट १ लाख रुपये!

0
58
Online Payment
Online Payment

Online Payment | आजकाल पैशांचा व्यवहार करण्यासाठी सोपा आणि सहज वापरता येऊ शकणारा मार्ग म्हणजे ऑनलाईन पेमेंट. तर ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या लोकांसाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI नं एक मोठा दिलासा दिला आहे. RBI नं यूपीआय पेमेंटच्या (ऑनलाईन पेमेंट) नियमांमध्ये बदल केले असून ज्यामुळे यूपीआय वापरणाऱ्या लोकांना १ लाख रुपयांपर्यंत ऑटो पेमेंट करता येणं शक्य आहे.

Online Payment | पेंमेट लिमिट वाढवण्याचा काय फायदा?

दररोज आपण बऱ्याच ठिकाणी पैसे खर्च करतो आणि अलीकडे या सर्वांचं पेमेंट आपण ऑनलाइन माध्यमातून करत असतो. अगदी मोबाईल बिल, वीज बिल, ईएमआय पेमेंट, मनोरंजन/ओटीटी सबस्क्रिप्शन, विमा, म्युच्युअल फंड आणि कर्जाची देयके हे देखील पेमेंट ऑनलाईन माध्यमातून केले जाते. सध्या यूपीआय ऑटो पेमेंट सर्व्हिसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यापुर्वी ऑनलाईन पेमेंट करण्याची लिमिट ही १५ हजार इतकी होती ज्यात सुमारे ६ पट वाढ झाली आहे. आता आपण ओटीपीशिवाय एक लाख रुपयांपर्यंत ऑटो पेमेंट करू शकणार आहोत.

Gold Silver Rate | सोने- चांदी खरेदीचा हाच ‘गोल्डन चान्स’

यूपीआय पेमेंट लिमिट वाढवणार असल्याची हिंट

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असून रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास ह्यांनी एज्युकेशन इंस्टीट्यूट आणि हॉस्पिटल मध्ये यूपीआय पेमेंट लिमिट वाढवणार असल्याची हिंट दिलेली आहे. ज्यात ऑनलाईन पेमेंट करण्याची लिमिट ही एक लाख रुपयांवरून (विथ ओटिपी) पाच लाख रुपये केली जाऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शिक्षण संस्था आणि रुग्णालयांमध्ये UPI पेमेंट मर्यादा वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

UPI वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ

भारतात UPI पेमेंट करण्‍याच्‍या संख्‍येत सातत्याने वाढ होत असून जर आपण NPCI डेटाबद्दल बोललो तर, गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये भारतात 11.23 अब्ज UPI व्यवहार झालेले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here