Onion news | केंद्र सरकार कांदा उत्पादकांना ‘गुड न्यूज’ देईल; दिल्लीत मोठी बैठक

0
43
Onion news
Onion news

Onion news |  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नी (Onion news) केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली असून, लवकरच कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकार हे काहीतरी सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन पियुष गोयल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिट करत याबद्दल माहिती दिलेली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना भेटून यावेळी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निवेदन दिलं. सह्याद्री ह्या अतिथीगृहावर पियुष गोयल व फडणवीस यांची भेट झाली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच ही  माहिती दिली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, राज्यातील शेतकरी बांधवांचे कांदा, कापूस आणि सोयाबीन ह्या महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत एक सकारात्मक बैठक ही सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे पार पडलेली असून, पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे तसेच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकी दरम्यान दिले आहेत.

Breaking | चांदवडमध्ये सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत ‘रास्ता रोको’

कांदा प्रश्नावर महत्त्वाची बैठक

राज्यातील शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर सोमवारी राजधानी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पीयुष गोयल यांच्या उपस्थित ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकचे व्यापारी देखील उपस्थित असणार आहेत.  केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील  सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव हे बंद आहेत.

आमदार दिलीप बनकर यांनीही याप्रश्नी केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. दिल्लीत होणाऱ्या ह्या महत्त्वपूर्ण बैठकीत आता काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

गेल्या आठवड्यातच अवकाळी आणि गारपिटीमुळे कांड व द्राक्ष ह्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आभाळी संकटामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असतांना आता कुठे त्यातून बळीराजा पुन्हा कसाबसा उभा रहात होता. पण, त्यात आता पुन्हा केंद्र सरकारने ‘निर्यातबंदी’ चे हत्यार उपसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आशिया खंडामधील आघडीची कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारपेठ ही नाशिक जिल्ह्यातच आहे.

Onion News | भारती पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; शेतकऱ्यांची मागणी

पण,  ज्या जगाच्या पोशिंद्यामुळे हे नावलौकिक मिळाले आहे. तो सध्या मोठ्या कात्रीत सापडला आहे. आणि त्याला कारणही काही अंशी तसेच आहे. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे कांदा व द्राक्ष ह्या नाशिक मध्ये पिकणाऱ्या प्रमुख पिकांसह इतर भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असताना, केंद्राने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे शेतकाऱ्यांमध्ये संतापाची लात उसळली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here