कांदा उपाययोजना समिती देवळ्यात दाखल ; दर घसरणीचे जाणून घेतली कारणे

0
24
देवळा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माजी पणन संचालक डॉ सुनिल पवार याना निवेदन देताना माजी सभापती केदा आहेर समवेत कुबेर जाधव ,जयदीप भदाणे , कृष्णा जाधव , जगदीश पवार आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा | सोमनाथ जगताप
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यात लाल कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारने सहकार ,पणन व वस्रोद्योग विभागाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी गठीत केलेली समिती शुक्रवारी (दि ३) रोजी देवळा बाजार समितीत दाखल झाली.

देवळा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने  माजी पणन  संचालक डॉ सुनिल पवार याना निवेदन देताना माजी सभापती केदा आहेर समवेत कुबेर जाधव ,जयदीप भदाणे , कृष्णा जाधव , जगदीश पवार आदी ( छाया -सोमनाथ जगताप )
देवळा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माजी पणन संचालक डॉ सुनिल पवार याना निवेदन देताना माजी सभापती केदा आहेर समवेत कुबेर जाधव ,जयदीप भदाणे , कृष्णा जाधव , जगदीश पवार आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

Lok Sabha Election Survey: 2024 मध्ये PM मोदींच्या विजयी रथात हिंदुत्वाची दौड कुठपर्यंत धावणार? सर्वेक्षणात मोठा खुलासा

समितीने व्यापारी प्रतिनिधी ,शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी , शेतकरी ,बाजार समितीचे अधीकारी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. या समितीने आठ दिवसात आपला अहवाल सरकारला सादर सादर करायचा आहे . समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी पणन संचालक डॉ. सुनील पवार हे असून ,विद्यमान पणन संचालक विनायक कोकरे ,जिल्हा निंबंधक सुनील खरे ,जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे ,मंगेश कदम , पणन मंडळाचे सरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी सद्स आहेत .सकाळी १० वाजता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी ,शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी ,शेतकरी यांच्याशी चर्चा करत वस्तुस्थिती जाणून घेतली .

यात विशेष करून राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदाधिकार्यांनी चर्चेत सहभाग नोंदवला ,कांदा उत्पादक शेतकरी व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव, जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाने, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव, माणिक पवार ,भारतीय किसान संघाचे जिल्हा संघटक चंद्रकांत चव्हाण आदींनी कांदा उत्पादनाला लागणारा उत्तपादन खर्च,शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक, कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, नाफेडने बाजार समित्यांमध्ये खरेदी न करता इतरत्र प्रोडुसर कंपन्या मार्फत मापक दराने सुरू केलेली तुटपुंजी खरेदी, या बाबी समितीच्या निदर्शनास आणून दिल्या.

यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याने द्राक्ष, डाळिंब या पिकांप्रमाणे कांदा पिकाचे राज्याचे धोरण तयार करून ते केंद्र सरकार कडे पाठवुन राष्ट्रीय कांदा धोरण तयार करण्यात भाग पाडावे. मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देण्यात अग्रेसर असणारे हे पिक आहे. कांदा निर्यात धरसोड वृत्तीची नसावी, कांदा पिकाचा पिकपेरा ऑनलाईन सर्वच शेतकरीवर्ग नोंदवून घेत नाहीत त्यामुळेच कीती लागवड क्षेत्र आहे हे अचूक शासकीय यंत्रणेस कळत नाही त्यासाठीच सॅटेलाईट वापरुन पिकपेरा कृषी व महसूल विभागाने गोळा करावा तरच किती ऊत्पादन होईल याचा अचूक अंदाज राज्य व केंद्र सरकार ला कळेल देशातील कांद्याची आवश्यक गरज बाजुला काढुन अधिक च्या मालाचे निर्यात धोरण ठरवता येईल. तरच कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांना उचित भाव मिळेल , मनरेगातील वीस टक्के निधी कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांपर्यंत थेट मिळवून देण्यात यावा, कारण एक एकर क्षेत्रात कांदा लागवड साठी 2022/23 साठी दहा हजार रु. खर्च आला दोन निंदनी (तण काढणे) पाच हजार रुपयांपर्यंत. खर्च कांदे काढणी, कापणी दहाहजार रुपए प्रत्येक एकर ,एकुण पंचवीस हजार रुपयांपर्यंत शेतकरीवर्ग एका एकरासाठी मजुर वर्गास देतो .

पाच एकर कांदा पिकवणारा शेतकरी एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत मजुरी असंरक्षित कामगाराना देतो . विचार करा आम्ही ऊधोजकाप्रमाणे रोजगार उपलब्ध करून देत आहोत. म्हणून मनरेगातील वीस टक्के निधी कांद्यावर खर्च होईल हे धोरण असावे. कारण हे पिक सर्व सामान्य शेतकरीवर्गाचे आहे. कांद्यावर व्यापार करणारे सध्या नफेखोर झालेत. त्यावर शासकीय अंकुश असावा . आजच्या घडीला लाल कांद्याला, तसेच १५ /२० दिवसात बाजारात येणाऱ्या रब्बी कांद्याला सरसकट ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावे.

कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे व त्यासाठी दरवर्षी ५,००० कोटी ची आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली, कांद्याला उत्तपादन खर्चावर आधारीत भाव मिळावा म्हणून उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन करण्यात यावी,त्यासमितीच्या माध्यमातून दिर्घकाळीन धोरण निश्चित करण्यात यावे, तसेच आज अखेर बाजार समित्यांमध्ये विकलेल्या लाल कांद्याला तात्काळ सरसकट कुठलेही निकष न लावता अनुदान देण्यात यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली,*सोमवारी लासलगाव बाजार समितीमध्ये निलाव बंद करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले, त्यावेळी पालक मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले की, येत्या आठ दिवसांत तज्ञ समिती तातडीने अभ्यास करून अहवाल सादर करेल,व त्यानंतर लगेचच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या बरोबर बैठक घेऊन अहवाल सादर केला जाईल,व तातडीने योग्य त्या उपाययोजना जाहीर करण्यात येतील असे आश्वासन दिले होते, त्यानुसार समिती गठीत होऊन चार दिवस झाले असुन, पुढिल आठवड्यात अहवाल सादर होण्याची शक्यता आहे,

यावेळी कांद्याच्या भावा संदर्भात समितीने उपस्थित शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकुन घेतले. राज्यभरातील शेतकऱ्यांची भूमिका शासन दरबारी अहवालच्या रूपाने मांडू, असे सर्व्यांना अश्वाशीत केले, याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, किशोर चव्हाण ,मविप्रचे संचालक विजय पगार ,जगदीश पवार ,भाऊसाहेब पगार ,जितेंद्र आहेर ,चंद्रकांत आहेर ,प्रदीप आहेर ,सम्राट वाघ , प्रशासक सुजय पोटे ,सचिव माणिक निकम आदींसह सर्व व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. केदा आहेर यांच्या हस्ते माजी पणन संचालक डॉ सुनिल पवार यांचा सत्कार करण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here