मुंबई: आज मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते भोंगा या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण झाले. हा 3 मे रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान चित्रपट प्रदर्शनाआधीच यावरुन वाद होतानाचे चित्र दिसू लागले आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर या यावर बोलताना म्हणाल्या की, ‘भोंगा’ चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा एक कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे. भोंग्याची पार्श्वभूमी मनसेने चांगली तयार केली’. सामाजिक मग धार्मिक तेढ याद्वारे भोंग्याला चांगली प्रसिद्धी दिली. कमर्शियल काम कसे करता येईल हे एखाद्यानं मनसेकडून शिकावं, असं ही त्या म्हणाल्या.
त्या नंतर त्या म्हणाल्या, ‘ 3 तारखेला मिटिंग घेणार म्हणे मुंबईचे वातावरण यांनी तापवलं आणि तेवढ्यात हा भोंगा चित्रपट प्रदर्शित करणं म्हणजे मनसेचा हा सगळा पब्लिसिटी स्टंट होता. भोंगा चित्रपट 2019 ला प्रदर्शित होणार होता.
भोंगा या चित्रपटाची निर्मिती निर्माते अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, यांनी केली आहे.तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी,अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम