सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | आमदार डॉ.राहुल आहेर हे विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाल्याने खर्डे येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी १०४००३ इतके मते मिळून आपले प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश निबाळकर यांचे पेक्षा ४८५४३ ची आघाडी घेत विजय मिळवून हॅट्रिक साधली.
Deola | देवळ्याच्या जनतेचा दादांना कौल; 52 हजार मतांनी राहुल आहेर आघाडीवर
पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विजय साजरा
डॉ. आहेर यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. याबद्दल तालुक्यातील खर्डे येथे भाजपचे पदाधिकारी व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सायंकाळी विजयी मिरवणूक काढत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी उपसरपंच सुनील जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षद मोरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, सचिन गांगुर्डे, आबा कुवर, पंकज गांगुर्डे, दिनेश मोरे, मनोज पवार, प्रवीण देवरे, शशिकांत ठाकरे, रामकृष्ण कुवर, हर्षद मोरे, जितेंद्र पवार, राकेश जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम