Gold Silver Rate| ऐन दिवाळीच्या तोंडावर दागिने खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण सुरू होती. युद्धामुळे भाव वाढले होते. किंमती चार हजारांनी वाढल्या. गेल्या तीन दिवसांत सोने-चांदीत घसरण झाली होती. दरम्यान, गुरुवारी भाव किंचित वाढले. आज सोने-चांदीचा असा भाव..
सोने वाढले
ऑक्टोबरचे शेवटचे दोन दिवस ते नोव्हेंबरची पहिली तारीख, अशा तीन दिवसांत सोने १,०२० रुपयांनी स्वस्त झाले होते. १ नोव्हेंबरला ३२० रुपयांनी किंमती घसरल्या. तर, २ नोव्हेंबरला ११० रुपयांनी वाढ झाली. आता २२ कॅरेट सोने ५६,६५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,७९० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.
India cricket team: भारतीय संघ हा इतिहास रचणार…! जो क्रिकेटच्या ५० वर्षांच्या इतिहासात घडला नाही
चांदीतही वाढ
मागील आठवड्यात चांदी १,२०० रुपयांनी घसरली होती. मागील दोन दिवसांत १ नोव्हेंबर रोजी १,२०० रुपयांनी चांदी घसरली होती. तर २ नोव्हेंबरला चांदीने ७०० रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव हा ७४,८०० इतका रुपये आहे.
किती कॅरेटचा कसा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), २४ कॅरेट सोने ६१,०९२ रुपये, २३ कॅरेट६०,८४७ रुपये, २२ कॅरेट सोने ५५,९६० रुपये तर, १८ कॅरेट ४५,८१९ रुपये, १४ कॅरेट सोने ३५,७३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. चांदीत वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ७१,६८४ रुपये झाला आहे.
Horoscope Today 03 November: या राशीच्या लोकांनी हे काम चुकूनही करू नये, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम