Maharashtra | ऐन दिवाळीच्या तोंडावर आता बस तिकिटही महागले

0
15

Maharashtra | एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सर्व सामान्य प्रवाशांना मोठा झटका देणारा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या काळात गर्दी हंगाम लक्षात घेऊन भाड्यांमध्ये थेट १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे.

गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ह्या दरवाढीचा फटका बसणार आहे. एसटीकडून ही भाडेवाढ ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या दरम्यान लागू केली जाणार आहे.

World Cup 2023 | हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर; पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड का?

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने हंगामी भाडेवाढ केली आहे. एसटीच्या निर्णयानुसार, या दिवाळीच्या हंगामात महामंडळाच्या सर्व बसच्या तिकीटांच्या दरात वाढ केली जाणार आहे. सर्व सरकारी बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्क्यांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 एसटी महामंडळाकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर लागू होणार आहे तर २७ नोव्हेंबर पर्यंत लागू असणार आहे. त्यानंतर पुन्हा मूळ तिकीटाच्या दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच, ज्या  प्रवाशांनी एसटीचे आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांनादेखील तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम ही प्रत्यक्ष प्रवास करताना बसच्या वाहकाकडे भरावी लागणार आहे.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here