Gold Silver Rate | इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, गुरुवारी सोन्याचा दर हा ६१,६१६ रुपये प्रति १० ग्रॅम असा होता. यावर्षी ४ मे रोजी सोने ६१,६४६ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहचले होते. त्यामुळे आता हा रेकॉर्ड मोडायला सोन्याच्या किंमतीला जास्त वेळ लागणार नाही असे, दिसत आहे.
चांदीचे दरही लवकरच त्यांचा पूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. दिवाळीपासून सोने-चांदीने आता मोठी भरारी घेतलेली आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरांत १,५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदी ४,६०० रुपयांनी महागली आहे.
सोन्याच्या दरांत घसरण
मागील १० दिवसांत सोन्याच्या किंमतीत १,५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ह्या आठवड्यात २० नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात ५० रुपयांची घसरण झाली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरांत ५० रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने हे ५६,९५० रुपये प्रति १० ग्रॅम असे होते. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१२० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.
Info-tech news | २० हजारांच्या घवघवीत डिस्काउंटसह आताच ऑर्डर करा Google Pixel हा फोन
चांदीत इतक्या रुपयांची दरवाढ
१३ नोव्हेंबरपासून ते आजपर्यंत चांदीने ४,६०० रुपयांची भरारी घेतली. २१ नोव्हेंबर रोजी चांदीच्या किंमतीत ४०० रुपयांची दरवाढ झाली. तर, २२ नोव्हेंबर रोजी दरांत ४०० रुपयांची घसरण झाली. २३ नोव्हेंबरला २०० रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता एक किलो चांदीचा दर हा ७६,२०० रुपये आहे.
१४ ते २४ कॅरेटचा असा दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोने हे ६१,३९४ रुपये तर, २३ कॅरेट सोन्याचा दर हा ६१,१४८ रुपये असा आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ५६,२३७ रुपये अशी आहे तर, १८ कॅरेट सोने हे ४६,०४६ रुपये असे आहे.१४ कॅरेट सोने हे ३५,९१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. एक किलो चांदीचा दर हा ७३,०६५ रुपये झाला.
(वायदे बाजारात व आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क व करांचा समावेश होत असल्याने किंमतीत तफावत दिसून येते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम