नाशिक मनपाच्या प्रशासकीय राजवटीतील अजब फतवा; रात्री १० वाजे नंतरच फटाके फोडण्याचं फर्मान

0
21

नाशिक | नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील अजब फतवा काढण्यात आलेला आहे. चक्क रात्री १० वाजे नंतरच फटाके फोडण्याच फर्मान काढण्यात आलं आहे. अकलेच्या तारा तोडत काढलेल्या प्रशासकीय हुकूमाचा नाशिककरांकडून निषेध करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी सरकार या कडे लक्ष देणार का? असा सवाल नाशिककरांनी विचारलेला आहे.

नाशिक हादरलं! बुडणाऱ्या दोन मैत्रिणींना वाचवण्यासाठी बंधाऱ्यात घेतली उडी पण…

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरीकांना आवाहन

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दिवाळीच्या निमित्ताने होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकाने नागरिकांना आवाहन केलेले आहे. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या प्रदुषणास आळा घालण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरीकांचा यामध्ये सहभाग मोलाचा आहे. फटाके फोडल्याने होणारे प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक आहे.

Nashik news | नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार

यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात नाशिक महानगरपालिकेकडुन देण्यात आलेल्या आहेत.

  • नागरिकांना पर्यावरणपूरक (हरीत) फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
  • फटाके फोडल्याने प्रामुख्याने हवा आणि ध्वनी प्रदुषण होते. वायु, ध्वनी, जल मृदा प्रदुषणामुळे केवळ मानवास नाही तर पशुपक्षी व इतर प्राणीमात्रांनाही इजा होऊ शकते, ती होऊ नये याकरिता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
  • मोठ्या लोकांनी जागरूकता ठेवून फटाके अतिप्रमाणात न वाजवणे आणि लहान मुलांना धोकादायक नसलेले फटाके वाजवू देणे.
  • वायु आणि ध्वनीप्रदुषण कमी करण्यासाठी नागरीकांनी स्वतःहुन प्रयत्न करावे.
  • फटाके फोडताना शक्यतो रात्री 10 नंतरच फोडावे.
  • फटाका वाजलेल्या स्थानापासून ४ मीटर अंतरापर्यंत १४५ डीबी (सी) च्या १२५ डीबी (एआय) ध्वनीपातळीचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन आणि विक्रीस मनाई आहे.
  • नाशिककरांनी महानगरपालिकेच्या आवाहनाचे पालन करून दिवाळीचा आनंद घेतांना पर्यावरणाची काळजी घ्यावी,

असे आवाहन नाशिक मनपाने सादर केलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here