OBC एल्गार मेळाव्यासाठी सिन्नरमध्ये कार्यकर्ते सज्ज; मोठया नेत्यांची असणार उपस्थिती

0
34

सिन्नर| OBC आणि भटके विमुक्त प्रवर्गातील आरक्षण बचावासाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणाऱ्या OBC एल्गार मेळाव्यासाठी सिन्नरमधून कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत. शुक्रवारी (दि. 17) नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्या होणाऱ्या या मेळाव्यासाठी तालुक्यातील माळी, वंजारी, धनगर यासह अठरापगड जातीतील समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे.

crime news | गिरणा नदीपुलावर चार वाहनांचा विचित्र अपघात

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध OBC आणि भटक्या जमाती असा संघर्ष राज्यात उभा राहिलेला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी ओबीसी प्रवर्गातील समाज घटकांकडून मागणी करण्यात येत आहे. तर OBC प्रवर्गात समाविष्ट करून मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावरून मांडली जाते आहे. सामाजिक आरक्षणाच्या या मुद्द्यावर ओबीसींची मोट बांधण्यासाठी राज्यातील माळी धनगर आणि वंजारी समाजातील प्रस्थापित नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असणाऱ्या अठरापगड जातींना देखील सामावून घेण्यात आलेले आहे. आपले आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम राहावे ही या अठरापगड जातींची मागणी असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्यात याच मागणीकडे सरकार आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले जाणार आहे.

Big News | माधुरी दीक्षित यांना खासदारकीचं तिकीट? भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं केलं स्पष्ट

यावेळी या OBC मेळाव्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यातील OBC नेते या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. सिन्नर तालुक्यातील OBC समाज बांधव या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत यासाठी गेल्या आठवड्याभर विविध गावांमध्ये बैठका आणि भेटी-गाठींचे आयोजन करण्यात आलेले होते. तालुक्यात धनगर वंजारी आणि माळी समाजाचे आणि त्या खालोखाल अठरापगड जातीतील नागरिक आहेत. या सर्वांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. समता परिषदेचे राजेंद्र भगत, राजेंद्र जगझाप, मेघा दराडे, डॉ .विष्णू अत्रे, रामभाऊ लोणारे, संदीप भालेराव, संतोष पवार, जयश्री पवार, शेखर कानडे, चंद्रकांत माळी, निवृत्ती पवार, युवा नेते उदय सांगळे, बंडूनाना भाबड, संग्राम कातकडे, बाबासाहेब कांदळकर, विनायक सांगळे, विलास सांगळे, लक्ष्मण बर्गे यांचे सह बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी OBC समाजातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे अस आवाहन करण्यात आलेलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here