Nashik news | आता रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी

0
28

Nashik news |  राज्यात रेशन दुकानावर अन्नधान्यासोबतच आता साडीदेखील मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी ही रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणांच्या निमित्ताने या साडीचे वाटप करण्यात येणार आहे.

चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती व दिवाळी या सणानिमित्त स्वस्त धान्य दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी ही लाभार्थी कुटुंबाला दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी या संदर्भातील शासननिर्णय जारी केला आहे. राज्यातील २४ लाख ५८ हजार ७४७ अंत्योदय शिधापत्रिकाधारक  कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Nashik news | सिन्नर येथे केमिकलचे ड्रम असलेल्या ट्रकला भीषण आग

राज्य यंत्रमाग महामंडळ संस्थेतर्फे ही योजना राबविली जाणार आहे. २०२३-२४ ह्या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ही  ३५५ इतक्या रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, तसेच जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक,आणि  हमाली यासाठी येणारा खर्च हा महामंडळाला राज्य शासन देणार आहे.

वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण हे जाहीर केले आहे. या धोरणानुसार, ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित केली आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या ही २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी आहे. या कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येकी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

Viral news | भर लग्नात नवरदेवाच्या भावंडात अन् मित्रांत तूफान हाणामारी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here