Skip to content

पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणीसाठी ७ नोव्हेंबर अखेरची मुदत


देवळा : नाशिक पदवीधर मतदार संघा करता मतदार यादी साठी नाव नोंदणी सुरू आहे. सदर मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत दि. 7 नोव्हेंबर 2022 ही आहे. 1 नोव्हेंबर 2022 रोजी पदवी किंवा पदवीकाला तीन वर्षे पूर्ण झालेले असेल असे पदवीधर मतदार यादी साठी नाव नोंदणी करू शकतात.सदर नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज 18 मंडळ अधिकारी देवळा व लोहणेर यांच्याकडे उपलब्ध आहे.

अर्जासोबत पदवी किंवा पदविकाचे प्रमाणपत्राची झेरॉक्स राजपत्रित अधिकारी यांच्याकडून अटेस्टेड किंवा नोटरी करणे आवश्यक आहे . तसेच रहिवासी पुरावा म्हणून कागदपत्र(आधार, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, ड्रायव्हिंग परवाना) देणे आवश्यक आहे . सदर कागदपत्र हे स्वयं साक्षांकित करून सदर अर्ज हा मंडळ अधिकारी यांच्याकडे दि 7 नोव्हेंबर पर्यंत जमा करावेत . असे आवाहन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!