द पॉईंट नाऊ ब्युरो : ईडीने सध्या एकामागे एक बड्या नेत्यांना झटके द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांना नोटीस पाठवली आहे.
ईडीने एकनाथ खडसे यांच्या जप्त केलेल्या मालमत्ता दहा दिवसांत शांततेत रिकाम्या करण्याची नोटीस दिली आहे. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इनसिया मुर्तझा यांच्या अकरा मालमत्तांबाबत ईडीने ही नोटीस बजावली आहे. यामुळे नेते मंडळींचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
दरम्यान, ईडीने नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी समन्स बजावत 8 जून रोजी चौकशीस हजर राहण्याची सूचना केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
गेल्या काही दिवसांत ईडीद्वारे राजकीय नेते मंडळी टार्गेटवर आहेत. यामध्ये अनेक बड्या नेत्यांना नोटीसा पाठवण्यात आल्याने, राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र या नोटीसा केवळ भाजप व्यतिरिक्त पक्षांच्या नेत्यांनाच का? असा सवाल देखील केला जात आहे. कारण आत्तापर्यंत ईडीद्वारे नोटीस बजावणे अथवा कारवाई करण्याच्या बाबी केवळ भाजप व्यतिरिक्त पक्षांच्या नेत्यांवरच घडल्याने सवाल उपस्थित केला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम