देशात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लाँच करणार; नितीन गडकरी यांची घोषणा

0
44

पुणे : देशात वाढते प्रदुषण आणि इंधनाची होत असलेली दरवाढ ही डोकेदुखी बनली आहे. आता यावर तोडगा म्हणून केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. देशात इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेस नंतर, आता आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रक लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते पुण्यात राज्यस्तरीय साखर परिषदेला संबोधित करत होते.

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर भर दिला. गडकरी म्हणाले, इथेनॉलचा वापर शेती आणि उपकरणांमध्ये कशा पद्धतीने करता येईल, याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नाही, तर पर्यायी इंधन हे ऊर्जेचे नवे भविष्य असल्याचेही ते म्हणाले.

ई-वाहनांना खूप मागणी

यावेळी गडकरी म्हणाले की, इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांसोबतच इलेक्ट्रिक हे भविष्य आहे. मला आठवतं, 3 वर्षांपूर्वी मी जेव्हा ई-वाहनांबद्दल बोलायचो तेव्हा लोक मला प्रश्न विचारायचे. पण आता बघा, ई-वाहनांना खूप मागणी आहे, लोक वाट पाहत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेसनंतर आता मी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लाँच करणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here