Nitin desai : हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवार आपल्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. एका प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे देसाई यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता. अशातच आता नितीन देसाईंचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.(nitin desai suicide)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांचे शवविच्छेदन बुधवार (०२ ऑगस्ट) रोजी जेजे रुग्णालयात (J J Hospital) चार डॉक्टरांच्या टीमने केले होते. यावेळी प्राथमिक निष्कर्षानुसार देसाईंचा मृत्यू (Death) फाशी घेतल्यामुळेच झाला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती रायगड पोलिसांनी (Raigad Police) दिली.
दरम्यान, काल पोलिसांना तपासावेळी नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या काही ऑडिओ क्लिप सापडल्या असून या रेकॉर्डमध्ये चार व्यावसायिकांची नावे असल्याचे बोलले जात आहे. तसेच कर्जत (Karjat) येथील स्थानिक आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाई आर्थिक विवंचनेत होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे माध्यमांशी बोलतांना सांगितले होते.
https://thepointnow.in/breaking-news-2/
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी प्रसिद्ध एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण आर्थिक चणचण असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यावर 180 कोटींचे कर्ज असल्याचे देखील बोललं जातं असतानाच आता त्यांच्या आत्महत्येचे मोठे अपडेट समोर आले आहे. ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
नितीन देसाई यांच्या आत्महत्या नियोजित असल्याच देखील बोललं जातं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटांचे भव्य सेट डिझाइन करणाऱ्या नितीन देसाई यांनी त्यांच्या मृत्यूचा सेटही डिझाइन केला होता. एनडी स्टुडिओसाठी कंत्राटावर काम करणाऱ्या मयूरने महत्त्वाची माहिती दिली आहे. या चित्रपटाचा आर्ट सेट तयार करणाऱ्या नितीन देसाई यांनी स्वत:च्या मृत्यूचा सेटही डिझाईन केल्याचा खुलासा त्यांनी केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोठा धनुष्यबाण तयार केला होता. या धनुष्यबाणाच्या मधोमध नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना एक टेप रेकॉर्डरही सापडला असून ती सुसाईड नोट असल्याचे समजते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम