Nikhil Wagle | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंच्या गाडीवर का झाला हल्ला..?

0
22
Nikhil Wagle
Nikhil Wagle

Nikhil Wagle | राज्यातील राजकिय वातावरण हे सध्या घडत असलेल्या गोळीबार आणि गुन्ह्यांच्या घटनांमुळे चांगलेच पेटलेले असताना, काल पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि वकील असीम सरोदे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड केली आणि त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या गाडीवर शाई देखील फेकली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, पुणे पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. निखिल वागळे यांनी पुणे येथे राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Abhishek Ghosalkar | ‘चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या’; काय म्हणाले फडणवीस..?

तर, त्यांच्या या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. विशेष म्हणजे भाजप कार्यकर्ते निखिल वागळे यांचा हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत होते. त्यासाठी भाजप कार्यकर्ते सभागृहात जाऊन बसले होते. मात्र, त्यावेळी तेथे पोलिसांनी त्यांची समजूत काढली. तर संबंधित कार्यकर्त्यांनी आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो असल्याचे कारण दिले. यानंतर  भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने देखील केली होती. दरम्यान, यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.(Nikhil Wagle)

Bharat Ratna | …तर बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न जाहीर करावा

नेमकं प्रकरण काय..?

पुण्यातल्या खंडोजी बाबा चौक येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. तर, या घटनेचे विरोधात आता महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. या हल्ल्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या समर्थकांवर अंडे देखील फेकल्याचे सांगितले जात आहे. हल्ला झाला तेव्हा निखिल वागळे आणि वकील असीम सरोदे हे त्याच गाडीत होते. ते दोघे त्या गाडीने कार्यक्रमस्थळी जात होते. तर, हा हल्ला भाजपच्या आंदोलकांकडून करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आंदोलकांकडून केला जात आहे.

दरम्यान, निखिल वागळे यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, याची खबरदारी पोलिस घेत आहेत. “भारतात आता लोकशाही उरलेली नाही”, असा आरोप निखिल वागळे यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच ते सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळेच त्यांची ही सभा उधळण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता. यावरच हा प्रकार थांबला नाही तर, सभेच्यावेळीही सभागृहाबाहेर मोठा राडा होताना बघायला मिळाला.(Nikhil Wagle)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here