मुंबई – राज्याच्या सत्ता नाट्यावर आधारित एक मराठी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “मी पुन्हा येईन !” अशी ही वेबसीरिज असून आज त्याचा टीझर रिलिज झाला आहे.
राज्यात घडलेल्या सत्तानाट्यावर आधारित ही वेबसीरिज लेखक अरविंद जगताप यांनी दिग्दर्शित केली असून भारत गणेशपुरे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, सिद्धार्थ जाधव आदि प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कथा-पटकथा अरविंद जगताप यांनी केले आहे. ही वेबसीरिज प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठी वेबसीरिज विश्वात राजकारणावर आधारित अनेक वेबसीरीज रिलीज होत असून काही महिन्यांपूर्वी अभिजित पानसे दिग्दर्शित “रानबाझार” वेबसीरीजने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अभिजित पानसेने “राजीनामा” वेबसीरीजची घोषणा केली होती. योगायोग म्हणजे ह्या सर्व वेबसीरिजचा निर्माता प्लॅनेट मराठी आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम