New Mobile | मानवाच्या मुलभुत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा मात्र आजकालच्या पिढीसाठी आणखी एक मुलभुत गरजच म्हणावं लागेल ती म्हणजे मोबाईल. यातच नविन वर्षात मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात Motorola Razr 40 Ultra आणि Razr 40 हे फोन डिस्काउंटेड किंमतीत उपलब्ध झालेले आहेत. मोटोरोला कंपनीनकडून क्लॅमशेल फोल्डेबल स्मार्टफोनच्या किंमतीत १७,००० रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.
Gold Silver Rate | सोने-चांदीची दरवाढीची सलामी; असे आहेत आजचे दर..?
New Mobile | Motorola Razr 40 Ultra वर विशेष डिस्काउंट..
हा फोन नविन वर्षातील कमी बजेटमध्ये बसणारा उत्तम पर्याय आहे. Motorola Razr 40 Ultra आणि Razr 40 या फोनची किंमत १७,००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली असून त्यामुळे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर रेजर ४० अल्ट्रा ७२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झालेला आहे.
Motorola Razr 40 Ultra हा फोन Ultra मॉडेल इनफिनिट ब्लॅक किंवा वीवा मजेंटा रंगात येतो तर मोटोरोला रेजर ४० सेज ग्रीन, समर लिलॅक आणि वॅनिला क्रीम रंगात सादर करण्यात आलेला आहे. कंपनी अधिकृत वेबसाइटवर काही बँक डिस्काउंट देखील देत असून ज्यामुळे निवडक बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहक हा डिस्काउंटेड किंमतीच्या वर अजून १,५०० रुपयापर्यंतचा एक्स्ट्रा सुट मिळवू शकणार आहेत.
Motorola Razr 40 Ultra, Razr 40 specifications
- स्नॅपड्रॅगन 8 + जनरल 1 मोबाइल प्लॅटफॉर्म, 8GB LPDDR5 रॅम, 256GB अंगभूत UFS 3.1 स्टोरेज
- मुख्य डिस्प्ले: 6.9″” FHD+ polED डिस्प्ले बाह्य डिस्प्ले, 3.6″” poLED डिस्प्ले
- डिस्प्ले रिझोल्यूशन – मुख्य डिस्प्ले: FHD+ (2640 x 1080) | 413ppi , बाह्य प्रदर्शन: 1066 x 1056 | 413ppi
- मुख्य कॅमेरा – 12MP (f/1.5, 1.4μm) | OIS, मागील कॅमेरा – 13MP (f/2.2, 1.12μm) | अल्ट्रा-वाइड + मॅक्रो | FOV 108°, सिंगल LED फ्लॅश
- समोरचा कॅमेरा – मुख्य डिस्प्ले 32MP (f/2.4, 0.7 μm) | 8MP (f/2.4, 1.4um) क्वाड पिक्सेल बाह्य डिस्प्ले मुख्य: 12MP (f/1.5, 1.4μm) | OIS वाइड: 13MP (f/2.2, 1.12μm) | FOV 108°
- समोर आणि मागील दोन्ही बाजूस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस, IP52 वॉटर-रेपेलेंट डिझाइन, बॅटरी -3800mAh न काढता येण्याजोगा, 30W टर्बोपॉवर चार्जिंग सपोर्ट 5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट (चार्जर वेगळे विकले जाते)
- Dolby Atmos आणि Spatial Sound Qualcomm Snapdragon Sound सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर
- सेन्सर्स – फिंगरप्रिंट रीडर, प्रॉक्सिमिटी + लाइट सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, ईकॉमपास, हॉल सेन्सर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम