NDA Cabinet Ministers List | आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून, यासाठी जगभरातील दिग्गज मंडळी दिल्लीत दाखल झाली आहे. भाजपने एनडीएच्या मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा दावा केला असल्याने या मित्रपक्षांनाही भाजपला काही मंत्रीपदं द्यावी लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून खासदारांना फोन फिरवले जात असून, यात देशातील TDP, LJP (R) आणि JDU या प्रमुख पक्षांसह राज्यातीलही काही खासदारांना फोन गेले आहेत.
नवीन मोदी सरकारमध्ये एनडीएच्या घटक पक्षांना मंत्रिमंडळात सामील करण्यासाठी भाजपने टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली असून, त्यानंतरच मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नावे फायनल झाली आहेत आणि आता यानंतर सकाळपासून खासदारांना फोन येत आहेत. (NDA Cabinet Ministers List)
NDA Cabinet Ministers List | राज्यात आतापर्यंत ५ खासदारांना फोन
राज्यातील महायुती सरकारमधीलही काही खासदारांना फोन आले असून, सकाळी दहावाजेपर्यंतच तिघांना फोन आले असून यात नितीन गडकरी, पियूष गोयल आणि रक्षा खडसे यांना भाजपने संधी दिल्याची माहीती समोर आली आहे. तर, शिंदे गटाकडून बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांना आणि रामदास आठवले यांनाही मंत्रिपदासाठी फोन आले आहेत. मात्र, सर्वप्रथम ज्यांचे नाव पुढे आले होते. त्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही पीएम कार्यालयातून फोन आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.(NDA Cabinet Ministers List)
Narendra Modi oath taking ceremony | केंद्रीय मंत्रीपदासाठी राज्यातील ‘या’ खासदाराचे नाव निश्चित
आतापर्यंत ‘या’ खासदारांना फोन आले?
- डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी)
- किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी)
- अर्जुन राम मेघवाल (भाजप)
- सर्बानंद सोनोवाल (भाजप)
- अमित शहा (भाजप)
- नितीन गडकरी (भाजप)
- राजनाथ सिंह (भाजप)
- पियुष गोयल (भाजप)
- ज्योतिरादित्य सिंधिया (भाजप)
- एचडी कुमारस्वामी (जेडीएस)
- चिराग पासवान (लोजप-आर)
- जयंत चौधरी (RLD)
- अनुप्रिया पटेल (अपना दल)
- जीतन राम मांझी (HAM)
- रक्षा खडसे (भाजप)
- प्रतापराव जाधव (शिंदे गट)
PM Narendra Modi | संविधानावर डोकं टेकवलं; ‘या’मुळे मोदींच्या शपथविधीची तारीख बदलली
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम