NCP MLA Disqualification | पुतण्याने बाजी मारली; अजित दादांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष

0
35
NCP MLA Disqualification
NCP MLA Disqualification

NCP MLA Disqualification |  राज्याच्या राजकारतील एक ऐतिहासिक निकालाचे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वाचन करत आहेत. शिवसेनेनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही उभी फुट पडली होती. अजित पवार हे काही महत्त्वाच्या नेत्यांसह आणि आमदारांच्या मोठ्या गटासह सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी आपला गट हाच मूळ राष्ट्रवादी असल्याचा दावा केला होता. दरम्यान, आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

पवार काका पुतण्यातील या पक्षीय संघर्षाचा आज निकाल लागला असून, यात पुतण्याने बाजी मारली आहे. ही पक्षफुटी होऊन आता तब्बल ७ महिने उलटले आहेत. याआधी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडयाळ हे दोन्ही अजित दादांच्या स्वाधीन केले. त्यानंतर आता या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दारम्यान, अपेक्षेप्रमाणे हादेखील निकाल अजित पवारांच्याच बाजूने लागला आहे.(NCP MLA Disqualification)

Nashik News | नाशिकमध्ये बबनराव घोलप यांनी ठाकरेंची साथ सोडली; ‘हे’आहे कारण..?

दरम्यान, अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. हा निकाल विधानसभेतील संख्याबाळाच्या आधारे दिला गेला असून, विधानसभेत अजित पवारांचेच संख्याबळ हे अधिक होते. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड ही घटनेला धरुन नसल्याचे दावा दोन्ही गटांनी सांगितले होते. तर, ३० जून २०२३ रोजी दोन्ही जणांकडून पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा कऱण्यात आला. यावर दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले असून, प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाही. त्यामुळे पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही, असे विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. (NCP MLA Disqualification)

NCP MLA Disqualification | पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही 

पुढे ते म्हणाले की,”या पक्षात कुठलीही फूट पडलेली नसून, जे गट तयार झालेले आहेत. दरम्यान, पक्षीय रचनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी हीच सार्वभौम आहे. राष्ट्रवादीची घटना सर्वात महत्त्वाची आहे. तसेच निकाल देताना मूळ पक्ष कुणाचा हे पाहणं महत्वाचं आहे. पक्षघटना, नेतृत्व रचना व विधिमंडळातील बहुमत याचा विचार करून हा निकाल दिला असल्याचेही नार्वेकर म्हणाले. (NCP MLA Disqualification)

Bachchu Kadu | बच्चू कडुंनी बोलून दाखवली नाराजी, म्हणाले ‘भिकार** योजना..’

“पक्षाचे अध्यक्ष, वर्किंग कमिटी आणि नॅशनल कमिटी ही पक्षाची निर्णायक कार्यपद्धत दर्शवते. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी देत आहे. तर, राष्ट्रवादी या पक्षात अध्यक्ष पदावर दोन्हीकडून दावा केला जात असून, दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्षाची निवड झालेली नसल्याचे आरोप केले जात आहे. त्यामुळे दोन समांतर नेतृत्व या ठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच या दोन्ही गटांकडून आमदार अपात्रतेबाबत  याचिका दाखल करण्यात आलेल्या असल्याचं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं.(NCP MLA Disqualification)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here