जितेंद्र आव्हाडांचे गोपीचंद पडळकरांना सणसणीत उत्तर

0
47

मुंबई – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतील एका जाहीर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत पडळकरांवर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटरवर एकामागोमाग एक ट्वीट करत पडळकरांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात की, १९९० नंतर शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही, हे विरोधकांच्या लक्षात आल्यानंतर ते सातत्याने पवारांवर खोटेनाटे आरोप करत आले. पण त्याचा कुठलाच परिणाम राज्याच्या जनतेवर झाला नाही.

तसेच, काहीजण केवळ आपण व आपला पक्ष चर्चेत राहण्यासाठी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची आणि शरद पवारांच्या विसर्जनाची गोष्ट करतात. जेव्हा शरद पवार प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म भरताना ज्या मारूतीचे दर्शन घ्यायचे. तिथे कुणीतरी आज बारामतीचा गड जिंकून दे, असे साकडे घातले आहे. तेव्हा तो मारुती देवळाबाहेर येऊन हसत विचारत होते, हे आत्ता आलेले ते कोण होते ?, असे म्हणत आव्हाडांनी पडळकरांवर टीका केली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान २०२४ च्या निवडणुकांमध्ये बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी एका गाण्याची ओळ घेऊन बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, “बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही”. दरम्यान, भाजपाचे ‘मिशन बारामती’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे. यासाठी भाजपचे अनेक नेते सध्या बारामतीचा दौरा करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here