कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला ईडीचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ईडीला जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ईडीकडून जामीन अर्जावर लेखी उत्तर आज दुपारी न्यायालयात सादर करण्यात येईल.
ईडी राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला विरोध करेल. आज दुपारपर्यंत अर्जाचे उत्तर दाखल केले जाईल, असे ईडीचे वकील सुनील गोन्झाल्विस यांनी विशेष पीएमएलए कोर्टात सांगितले. नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर ईडी आज उत्तर दाखल करणार आहे. न्यायालयाने ईडीला सोमवारी उत्तर देण्यास सांगितले होते. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला आहे.कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर सोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम