Navratri-पोलिसांनी घेतला मोठा निर्णय;नवरात्रोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी

0
64

Navratri Utsav 2023 : राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला. परंतु गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे, डॉल्बी आणि लेझरचा वापर करण्यात आला होता. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत लेझरमुळे नाशिकमध्ये अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाली. तर अनेकजण आपली दृष्टी गमावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात झालेल्या प्रकारामुळे नाशिकमध्ये डीजे आणि लेझरवर पोलीस आयुक्तालयाने निर्बंध घातलेले आहेत. तसेच नवरात्रोत्सवात (Navratri Utsav) लेझर आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Maharashtra News : अजितदादा मुख्यमंत्री होणार?धर्मरावबाबा यांच वक्तव्य

नाशिक शहरात विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरोद्ध तसेच डीजे वाजवणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच लेझरमुळे अनेक तरुणांच्या डोळ्यांना इजा झाल्याने नाशिक पोलिसांनी नवरात्रोत्सवात डीजे, डॉल्बी आणि लेझरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांनी डीजेचा दणदणाट आणि लेझरचा झगमगाट करत पोलिसांचे आदेशाला पायदळी तुडवले होते. विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादेचे पालनही झाले नाही. अनेकांनी त्रास झाल्याच्या तक्रारी देखील केल्या होत्या. त्यामुळे आता शहर पोलिसांनी डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजेचालकांविरोद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Laser Show | लेझरने दिला डोळ्यांत न मावणारा अंधार ! 

याचबरोबर आता गरब्याचे आयोजन करणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांना लेझर उपकरणांचा वापर करता येणार नाही. नवरात्रोत्सवात गरबा आमि दांडिया आयोजित करणाऱ्या मंडळांना डीजे लावण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तसेच साउंड सिस्टिमचा मर्यादित आवाजात वापर करण्याचे आदेश पोलिसांनी काढलेले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच यासंदर्भातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आयोजकांना पोलिसांकडून सूचना करण्यात येत आहे. 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सव आणि नियमांसंदर्भात पोलिस आयुक्तालयात बैठक होण्याचीही शक्यता आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here