नवनीत राणांचे लिलावती रूग्णालयातील एमआरआय फोटो व्हायरल झाल्या प्रकाराबद्दल राणांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर रुग्णालयातील डॉक्टरांकडे रिपोर्टबाबत विचारपूस केली, असता नवनीत राणा यांनी टोला लगावला.
राणा म्हणाल्या, मी लिलावती होते तेव्हा जे फोटो व्हायरल झाले असे अनेकदा फोटो व्हायरल झाले आहेत. जर मी पोलिस कस्टडीत असताना रुग्णालयात दाखल केल्यावर फोटो व्हायरल झाले असते, तर पोलीस विभागाला रुग्णालयाकडे चौकशीचा अधिकार आहे. हा अधिकार पोलीस विभागाचा आहे मुंबई महापालिकेचा नाही.
ज्या पद्धतीनं एक महिला दुसऱ्या महिलेच्या वैयक्तिक तपासण्या आणि त्यावरील उपचारांबाबत विचारणी केली असा अधिकार देशात अद्याप कोणालाही देण्यात आलेला नाही , यावर कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी किशोरी पेडणेकरावर सडकून टीका केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम