Navneet Rana | लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तयार झाले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. यातच अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि भाजप उमेदवार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या व्यक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा ओवेसींना खुलं चॅलेंज दिलं आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये असदुद्दीन औवेसींविरुद्ध (Asaduddin owaisi) भाजपच्या माधवी लता निवडणुकीत उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचारार्थ नवनीत राणांनी हैदराबादमध्ये सभा घेतली.
Navneet Rana | नेमकं प्रकरण काय..?
यावेळी बोलताना नवनीत राणांनी(Navneet Rana) औवेसींच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत “फक्त १५ सेकंद पोलिसांना हटवा. मग या दोन्ही भावांना कुठून कुठे पळावं हेदेखील समजणार नाही, या शब्दांत औवेसी बंधुंवर निशाणा साधला. त्यानंतर, ओवैसींनी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्यांनी नवनीत राणांचे नाव न घेता, “माझा लहान भाऊ हा तोफ आहे, असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देत नवनीत राणा यांनी “असल्या तोफा आम्ही सजावटीसाठी वापरतो, असा घणाघात केला.
तुमच्याकडून सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही; राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला
१५-२० कोटी लोक खुलेआम धमकी देतात
या व्यक्तव्यावरून हैदराबादमध्ये नवनीत राणांवर (Navneet Rana) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या. “हैदराबादमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अशा गुन्ह्याला मी मोजतही नाही. मला एक गोष्ट समजते की, ज्या देशात आम्ही सव्वाशे कोटी लोक आहोत. तिथे हे १५-२० कोटी लोकसंख्या असलेले लोक खुलेआम धमकी देतात की, पोलीस हटवा. आम्हाला खुलेआम धमकी देणाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल आणि ते उत्तर मी दिले आहे.
आम्हीही काही बांगड्या घालून बसलेलो नाही
या सव्वाशे कोटी लोकसंख्येत आम्ही घाबरुन बांगड्या घालुन बसलेलो नाही. आमचे संस्कार, संस्कृती हे आमच्या पाठिशी आहे. ओवैसींच्या आव्हानाला मी मोजतही नाही. ते म्हणतात की,”छोटा खूंखार आहे”, पण असे खूंखार आम्ही आमच्या घराबाहेर पाळतो, आता काय ते तुम्ही समजून घ्या, असं म्हणत नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. हैदराबाद मध्ये हिंदूंना दाबून ठेवलंय, त्यामुळे त्यांच्यासाठी बोलावंच लागेल. या हिंदूस्थानात, हे असे पाकिस्तान प्रेमी लोकं काहीही बोलत असतील. तर, आम्हीही काही बांगड्या घालून बसलेलो नाही, असा इशाराच नवनीत राणा यांनी ओवैसींना दिला आहे.(Navneet Rana)
Bacchu Kadu | नवनीत राणांचा प्रचार नाही, पराभव करणार; बच्चू कडू कडाडले
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम