Nashik Political | विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. हिरे यांनी आज सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली असून त्यांना शुभेच्छा देत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. अपूर्व हिरे अजित पवारांच्या भेटीला
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. माजी आमदार डॉ. अपूर्व हहिरे यांचे अजित पवारांसोबत चांगले संपर्क असल्यामुळे आज सकाळी मुंबई येथे हिरे यांनी त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा पक्षप्रवेश करून घरवापसीचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा बैठकीचे निमंत्रण
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेत, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच येत्या 5 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे.” अशी माहिती डॉ. अपूर्व हिरे यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम