Nashik Political | नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी करण्यात आली. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. आता या प्रश्नावरून भाजपमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे आणि दिलीप बोरसे यांच्यासह विविध अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी करत आव्हान उभे केले होते. यामुळे बहुतांश बंडखोर इतके प्रबळ होते की पक्षाच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा त्यांच्या मागेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व यंत्रणा उभे राहिले होते.
भाजपचे बंडखोर घरवापसीच्या तयारीत
यामध्ये बंडखोरी केलेल्या बहुतेक उमेदवारांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्याचा उपयोग करून विविध इशारे देत बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेशाची तयारी केल्याची माहिती आहे. त्यामुळेच पक्षाचे पदाधिकारी व आमदार अस्वस्थ झाले असून याची पहिली प्रतिक्रिया नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशारामुळे समोर आली आहे.
आमदार राहुल ढिकले यांनी नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली असून त्यांच्या विरोधात काही समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी केली होती. त्यामुळे पक्षाच्या काही माजी नगरसेवकांनी देखील गणेश गीते यांना मदत केली होती. तर नाशिक पश्चिम मतदार संघातून आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात दिनकर पाटील यांनी बंडखोरी करत मनसेकडून उमेदवारी केली. त्यांना 35 हजारांहून अधिक मते मिळाली असून चांदवड मतदार संघामध्ये पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष व नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी बंडखोरी केली होती. केदा आहेर यांना देखील 40 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
Nashik Political | कळवणमध्ये घड्याळाने मारली बाजी; चौरंगी लढतीत गड राखत भाजप विजयी
नवनिर्वाचित आमदारांनी सामूहिक राजीनामे देण्याचा दिला इशारा
या बंडखोरांनी ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची चिंता वाढवली होती. त्यामुळे आमदार आणि त्यांनी बंडखोरांमध्ये निवडणुकीत झालेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय हल्ले, निवडणूक संपल्यावरही कायम राहणार असे चित्र आहे. आता यापैकी काही बंडखोरांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची संधान करून भाजपमध्ये प्रवेशाची तयारी सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. भाजपचे पदाधिकारी आणि आमदार या चर्चेमुळे संतप्त झाले असून आमदार ढिकले, पप्पू माने, दिनकर आढाव यांच्यासह विविध नेत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत, याला विरोध केला आहे. अशा बंडखोरांना पक्षात प्रवेश दिले तर आपण सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम