Nashik Political | प्रचारात दिलेल्या आश्वासनामुळे भाजपची गोची; ‘ते’ आश्वासन पुर्ण होणार की नाही…? लागली पैजांची बोली

0
64
#image_title

Nashik Political | विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत मतांनी विजय मिळवला. तर भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. निवडणुकीत मिळवलेल्या या यशामुळे भाजप नेत्यांची गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष भाजपच्या मंत्र्यांची यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड मतदार संघात प्रचार सभा घेतली होती. भाजपचे उमेदवार असलेल्या डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना जाहीरपणे आश्वासनही दिले होते. हे आश्वासन आता त्यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Nashik Political | कळवणमध्ये घड्याळाने मारली बाजी; चौरंगी लढतीत गड राखत भाजप विजयी

राहुल आहेर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे दिले होते आश्वासन

भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी विजयाची हॅट्रिक करत पुन्हा एकदा आमदारकीचा बहुमान मिळवला असून राहुल आहेर यांना मंत्री करणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते परंतु राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पहिल्या टर्मलाच भाजप विरोधात बसली. त्यानंतर सत्तेत येऊन देखील बहुतांश महत्त्वाची पदे सहकारी पक्षांना द्यावी लागली. त्यामुळे पक्षातील अनेकांना मंत्री व अन्य पदांपासून वंचित राहावे लागले होते. याचा फटका आमदार राहुल आहेर यांना देखील बसला. यंदाच्या निवडणुकीत चांदवड येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वेळेचा शब्द पाळता आला नाही. परंतु यंदा मात्र डॉ. राहुल आहेर यांना निवडून दिल्यास मंत्री करणार असे आश्वासन दिले होते. यावेळी त्यांनी 20 हजाराच्या आत मताधिक्य मिळाल्यास राज्यमंत्री तर 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्यास कॅबिनेट मंत्री करणार. असे आश्वासन दिले होते.

मंत्रिमंडळ रचनेनुसार भाजपचे सुमारे 21 मंत्री असणार? 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राहुल आहेर यांना 1 लाख 4 हजार मते मिळाली असून ते 48 हजार 961 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दांनुसार आमदार राहुल आहेर यांना कॅबिनेट मंत्री करावे लागणार आहे. भाजपला स्वबळावर 130 हून अधिक जागा मिळाल्या असून मंत्रिमंडळ रचनेनुसार सुमारे 21 मंत्री भाजपचे असणार आहेत. त्यात, सर्व विद्यमान मंत्री निवडून आले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला शब्द पाळणार का? हा चर्चेचा विषय बनला आहे. चांदवड मतदार संघामध्ये यावर अनेकांनी पैजादेखील लावल्या आहेत.

Nashik Political | फरांदेंची हॅट्रिक, हिरेंनी बंडखोरांना चारली धुळ; नाशिकच्या तिन्ही मतदारसंघात कमळ फुलले!

तर नाशिक जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत. हे दोन्ही मंत्री पुन्हा निवडून आले असून अशा परिस्थितीत भाजप नाशिकला मंत्रीपदासाठी न्याय देऊ शकेल का? हा मोठा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पहिल्याच मंत्रिमंडळात नेमणुकीत येतो किंवा त्यासाठी वाट पाहावी लागते. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here