Nashik Political | ‘फरांदे-गीते’ पुन्हा आमने-सामने; पोलीसांच्या मध्यस्थीने परीस्थिती नियंत्रणात

0
17
#image_title

Nashik Political | आज विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान प्रक्रिया पार पडत असून राज्यभरात सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी आमदार एकमेकांसमोर आल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच जुने नाशिक परिसरात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे व महाविकास आघाडीच्या उमेदवार वसंत गीते आमने-सामने आले होते. ज्यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Nashik Political | नाशकात राजकिय वातावरण तापले; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस

नेमके काय घडले? 

महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे जुने नाशिक परिसरातील दूध बाजार भद्रकाली पोलीस ठाणे शेजारील मतदान केंद्रावर लोकांशी संवाद साधत असताना त्यावेळी, तिथे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते दाखल झाले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करून फरांदे यांना तिथून बाहेर काढले. यावेळी कुठलाही वादविवाद झाला नसून परिस्थिती तणावपूर्वक झाली होती.

Political News | परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

लोकसभेला ही आले होते समोरासमोर

दरम्यान, लोकसभा मतदानावेळी देखील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे व वसंत गीते आमने-सामने आले होते. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर वाद टाळला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील गीते आणि फरांदे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here