Political News | केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी लोकसभा निवडणुकीला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी, “माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मला जाहीर पाठिंबा देऊन प्रचार केला. परंतु मी मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात महायुतीसाठी सकारात्मक वातावरण असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना त्याचा झाला आहे.” असा दावा त्यांनी यावेळी केला.
“मला त्यांच्या प्रचाराची परतफेड करण्याची गरज वाटत नाही”
भाजपाच्या कॉलेज रोडवरील मीडिया सेल कार्यालयात माध्यमांची संवाद साधताना त्यांनी, “लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी मला जाहीर पाठिंबा दिला होता व माझा प्रचार देखील केला होता. परंतु खडसे यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी केलेल्या प्रचाराची परतफेड मला करण्याची गरज वाटत नाही. त्यांनी माझा उघड प्रचार केला असला तरी रोहिणी खडसे यांचा प्रचार मी करणार नाही. मुक्ताईनगरमध्ये मी महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार आहे.” असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लोकसभेवेळी वापरलेला फेक नरेटिव्ह आता चालणार नाही!
पुढे बोलत त्यांनी, “लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिलांना एक लाख रुपये देणार असे आश्वासन दिले होते. मात्र निवडून आल्यावर त्या आश्वासनाची पूर्तता ते करू शकले नाहीत. ते नेहमी अपूर्ण माहिती घेऊन बोलत असतात. भाजप करता उत्तर महाराष्ट्रात वातावरण अनुकूल राहिले असून लाडकी बहिणी योजनेचा फायदा अनेक महिलांना झाला आहे. त्यामुळे महिलांना बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करता आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींची मदत दीड हजारांवरून दोन हजार शंभर रुपये करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक क्षमता आणखीन वाढणार आहे.” असे देखील त्या म्हणाल्या.
“लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह सेट केल्याने विरोधकांनी यश मिळावले, परंतु विधानसभेत फेक नरेटिव्ह काम करणार नाही.” असा दावाही त्यांनी केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अमर साबळे, शाहरुपाध्यक्ष पवन भगूरकर, प्रदेश प्रवक्ते पेशकार, हेमंत शुक्ला, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे, सोनल दगडे आदी यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम