Nashik Political | 2008 साली नाशिक पश्चिम मतदार संघाची निर्मिती झाली, अन् 2009 च्या विधानसभा निवडणुकीची मनसेने हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. आता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघातून मनसेचे उमेदवार दिनकर पाटलांनी प्रचारात आघाडी घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Nashik Political | नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवार देण्याची खेळी; गणेश गीतेंचा गंभीर आरोप
मनसेकडून प्रचाराला सुरुवात
दिनकर पाटलांनी मनसेकडून उमेदवारी जाहीर होताच प्रचारास सुरुवात केली असून “डोअर टू डोअर” मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना विकासाचे व्हिजन सांगणे सुरू केले आहे. या मतदारसंघात सातपूर व अंबड या दोन औद्योगिक वसाहती येत असल्यामुळे या ठिकाणी नवे उद्योग आणण्याबरोबरच उद्योगांचा विकास करणे, पर्यायाने रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतची ‘ब्लू प्रिंट’ ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहे.
महायुती आणि महाआघाडीला मनसेचे तगडे आव्हान
2019 पासून दिनकर पाटील विधानसभा आणि लोकसभेची तयारी करीत होते. संपूर्ण मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क असून प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक असताना त्यांनी स्वतःला प्रभागापुरते मर्यादित न ठेवत संपूर्ण शहर व जिल्ह्यातील विकास कामांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊनच ते या निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांना संपूर्ण मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये संभाव्य लढतीची शक्यता वर्तवली जात होती. परंतु दिनकर पाटील यांनी आव्हान निर्माण केल्याने महायुती बरोबरच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तरुणांकडून मिळतोय प्रतिसाद
दरम्यान, पश्चिम विधानसभा मतदारसंघात आजही मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे तरुण वर्गात या पक्षाची मोठी क्रेझ असून दिनकर पाटील यांना प्रचारादरम्यान तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. तरुणांकडून उत्स्फूर्तपणे दिनकर पाटील यांच्या उमेदवारीला समर्थन दिले जात असून प्रचारात स्वतःहून ही तरुण मंडळी सामील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणांच्या वाढत्या प्रतिसादामुळे इतर उमेदवारांना आता घाम फुटू लागला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम