Nashik News | नाशिक शहर पोलिसांकडून हद्दपार पवन पवार व विक्रम नागरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या दोघांसह इतर तडीपारांचा शोध सुरू असून विनापरवानगी शहरात आढळल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहर पोलिसांकडून राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये पवन पवार आणि विक्रम नागरे यांचेही नाव होते. तरी देखील त्यांनी हजारो नागरिकांच्या समोर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Nashik News | सुधाकर बडगुजरांविरूद्ध अंबड पोलीसांत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय…?
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 737 संबंधितांवर हद्दपारची कारवाई
विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहर पोलिसांनी अवैध धंदेचालक व दोन किंवा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 737 गुन्हेगारांना शहरातून ठराविक कालावधीसाठी हद्दपार केले आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवार दिनांक 20 रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत शिथिलता देत, मतदान करण्याची मुभा दिली आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांना पुन्हा शहरा बाहेर जाण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी शहर पोलिसांकडून संबंधितांना हद्दपारच्या नोटिसा बजावण्यात आल्या. हद्दपार केलेल्या 737 संशयितांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शरद पवार गट व भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वांना 14 व 15 नोव्हेंबर रोजी नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
14 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना शहराबाहेर राहण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील भाजप कामगार आघाडीचे माजी पदाधिकारी विक्रम नागरे व वंचितचे निलंबित पदाधिकारी पवन पवार या दोघांनी शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यामुळे हद्दपार असताना देखील शहरात विनापरवानगी वास्तव्य करत प्रचार सभेत सहभाग घेत हद्दपारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करून तातडीने शहरा बाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत.
Nashik News | नाशकात मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेत मंडप उडाल्याने गोंधळ; दोन कार्यकर्ते जखमी
‘या’ गुन्हेगारांवर ही कारवाई
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, शहरातील 13 पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीसचौकी अंतर्गत शहर पोलीस तडीपार गुन्हेगारांचा शोध घेत असून, गणेश भागवत सोनावणे, जाकीर रजमान शेख, संदीप कुमावत, नारायण भालेराव हे देखील विनापरवानगी शहरात फिरताना आढळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम