Dindori | ‘विधानसभा निवडणूक 2024 साठी आयोगाकडून जाहीर सूचनांचे कडेकोटपणे पालन करावे’ – आप्पासाहेब शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी

0
20
#image_title

वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | आयोगाच्या दिनांक 16/11/24 च्या पत्रामध्ये मतदान केंद्राबाहेर उभारण्यात आलेले राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचे निवडणूक बूथ (तात्पूरते कार्यालये), मतदान केंद्राच्या नजीक शस्त्र बाळगणे व मतदान केंद्राबाहेरील संरक्षण व्यवस्था याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या मधील काही ठळक सूचना पुढीप्रमाणे आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर २०० मि. त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत. एकाच इमारतीत किंवा आवारामध्ये अनेक मतदान केंद्रे असल्यास अशा सर्व मतदान केंद्राकरिता मिळून केवळ एक निवडणूक बूथ प्रत्येक उमेदवाराकरिता २०० मि. त्रिज्येच्या बाहेर उभारता येईल. प्रत्येक निवडणूक बूथवर केवळ ०१ टेबल व ०२ खुर्चा तसेच १०x१० फूट पेक्षा मोठा नसेल असा छोटा तंबू उभारता येईल.

Dindori | तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्रच्या वतीने बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

निवडणूक बूथमुळे सार्वजनिक, खाजगी मालमत्तेचे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी

असे निवडणूक बूथ उभारण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यकते नुसार, शासकीय प्राधिकरणे तसेच स्थानिक प्राधिकरणे यांच्या परवानग्या घेणे आवश्यक राहिल. निवडणूक बूथ उभारल्यामुळे सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे अतिक्रमण होणार नाही, याची सदर दक्षता घेणे आवश्यक आहे. असे निवडणूक बूथ धार्मिक जागेमध्ये किंवा परिसरात उभारण्यात येऊ नये. असे निवडणूक बूथ शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येऊ नये. उमेदवाराचे कार्यालय साधे असणे आवश्यक आहे व त्यावर कोणतेही पोस्टर, ध्वज, चिन्ह किंवा अन्य प्रसिध्दी साहित्य असता कामा नये.

अशा बूथचा वापर मतदारांना केवळ अशासकीय ओळखचिट्ठया देण्याच्या कारणास्तव करता येईल. मात्र, अशा ओळख चिठ्यांवर राजकीय पक्षाचे नाव तसेच उमेदवाराचे चिन्ह असू नये.निवडणूक बूथवर उपस्थित व्यक्तींकडून मतदानाकरिता येणाऱ्या मतदारांना कोणताही अडथळा किंवा प्रभाव होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून २०० मि. परिसरात कोणताही प्रचार अनुज्ञेय नाही. आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक तसेच निवडणूकीसाठी प्राधिकृत निवडणूक/पोलीस कर्मचारीवगळता कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्राच्या १०० मि. परिघामध्ये तसेच मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट नेण्यास प्रतिबंध आहे. गुन्हेगारी घटनेशी संबंधित व्यक्तींना निवडणूक बूथवर नियुक्त केले जाणार नाही, याबाबतची दक्षता राजकीय पक्ष/उमेदवाराने घेणे आवश्यक आहे.

CAPF ची व्यवस्था करणे हे पोलीस आयुक्त/पोलीस अधिक्षक यांचे कर्तव्य

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १३४ (ब) नुसार या कलमाद्वारे परवानगी दिलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रामध्ये किंवा त्या परिसरात शस्त्र घेऊन जाण्यास किंवा शस्त्र दाखविण्यास प्रतिबंध आहे. मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस कर्मचारी, CAPF ची व्यवस्था करणे हे पोलीस आयुक्त/पोलीस अधिक्षक यांचे कर्तव्य असून मतदानाच्या ०१ दिवस आधी ही यंत्रणा कार्यान्वीत असणे आवश्यक आहे.एखाद्या मतदान केंद्रावर CAPF ची नियुक्ती करण्यात आली असेल व तो काही कारणास्तव मतदान केंद्रावर वेळेत पोहचू शकला नाही. तर तो पर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान चालू करता येणार नाही.

Dindori | दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे दुख:द निधन

मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्राच्या बाहेर कायदा सुव्यवस्था राखणे ही राज्य पोलीसांची जबाबदारी आहे. ज्या मतदान केंद्रावर CAPF ची नियुक्ती करण्यात आली असेल त्या मतदान केंद्रावर CAPF ला राज्य पोलीस दलातील पोलीसांकडून बदली कर्मचारी देता येणार नाही. वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 122 दिंडोरी विधानसभा मतदारसंघ आप्पासाहेब शिंदे यांनी  केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here