Nashik News | राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी असून आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे अशातच नामपुर मालेगाव रस्त्यावरील सावतावाडी येथे स्थिर नियंत्रण पथकाने व पोलिसांनी चार चाकी वाहनांची तपासणी केली असता वाहनातून 14 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
Nashik News | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा उद्या महाराष्ट्रात; नाशकात जाहीर सभेचे आयोजन
रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी घेऊन जात असल्याचा दावा
मालेगाव तालुक्यातील व्यापारी ऋषिकेश भामरे मालेगावहून नामपूरकडे जात असताना सावतावाडी जवळ पोलिसांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून 14 लाखांची रोख रक्कम सापडली. पोलिसांच्या पथकाने भामरे यांची चौकशी केली असून ते नामपुर बाजार समितीत व्यापारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भामरे ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी घेऊन जात असल्याचे समजले. या संदर्भात स्थिर नियंत्रण पथकाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 14 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.
जप्त केलेली रक्कम वरिष्ठ कार्यालयाकडे सुपूर्त
जप्त केलेली रक्कम तपासणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवली जाणार असल्याचे पथकाने सांगितले. चंद्रकांत साबळे, पथकाचे प्रमुख अनिल सानप, साहेबराव सोनवणे, रणजीत सोळंके, गजानन कासार गणेश जाधव आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम