Nashik News | नाशिकमध्ये वर्गात चक्कर आल्याने सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

0
57
Nashik News
Nashik News

Nashik News |  नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यानुसार नाशिक शहरातील एका शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील सिडको परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा वर्गातच मृत्यू झाला आहे. दिव्या त्रिपाठी असे या मृत मुलीचे नाव आहे.

Nashik News | नाशिकमध्ये दादा गटाला मोठा धक्का; आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

Nashik News | नेमकं काय घडलं..?

ही मुलगी शाळेत चक्कर येऊन बेंचवरुन खाली पडली असता, तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. केवळ चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीचा मृत्यू केवळ चक्कर आल्याने झालाय की, यामागे काही वेगळे कारण आहे..? याबाबत सविस्तर तपास पोलिस करत आहेत.(Nashik News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here