Lok Sabha Oath Ceremony | लोकसभेचे पहिले अधिवेशन दिल्लीत सुरू असून, यात आज खासदारांनी शपथ घेतली. दरम्यान, यावेळी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार (Hingoli Lok Sabha) नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Bapurao Patil Ashtikar) यांना शपथ घेताना रोखण्यात आले. शपथ घेताना महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी आपल्या मातृभाषेत मराठीत शपथ घेतली. काल रावेर लोकसभेच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही मराठीत शपथ घेतली.
काय म्हणाले होते नागेश पाटील आष्टीकर
दरम्यान, आजच्या सत्रात हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे मराठीत शपथ घेत असताना , “मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो असल्याने, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आणि माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन मी शपथ घेतो की, विधीद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रति श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन व भारतीय एकात्मतेचे स्मरण करेन, जे कर्तव्य मला प्राप्त होते, ते मी नेकीने पार पाडेल”.(Lok Sabha Oath Ceremony)
नेमकं काय घडलं..?
दरम्यान, ही शपथ घेत असतानाच अध्यक्षांनी आक्षेप घेतला आणि त्यांना थांबवलं. तर, जे लिहिलं आहे तेच वाचण्यास सांगितले. “असं चालत नाही, जे मराठीत लिहिलेलं आहे, तेच वाचा आणि तशीच शपथ घ्या”, असे अध्यक्षांनी त्यांना सुनावले. त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा एकदा नवीन शपथ घेतली आणि बाळासाहेब ठाकरे आणि वडिलांच्या नावाचा उल्लेख टाळत जशी लिहिलेली होईत. तशीच शपथ घेतली.(Lok Sabha Oath Ceremony)
लंकेंनी विखेंची अशी जिरवली
तर दुसरीकडे अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके (nilesh lanke) यांनी थेट इंग्रजीत शपथ घेतली आहे. प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी सुजय विखे (sujay vikhe) यांनी लंके यांना इंग्रजी बोलून दाखवण्याचे आव्हान दिले होते. यावर निवडणून आल्यानंतर लंके यांनी आता लोकसभेत पहिले भाषणच इंग्रजीत करतो, असे उत्तर दिले होते. यावर लंके यांनी चोख उत्तर दिले असून, त्यांनी थेट लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथच इंग्रजीत घेतली आहे.
Lok Sabha Election Result | विजयी उमेदवारांची यादी; महायुतीला ओवर कॉन्फिडन्स नडला..?
आज ‘या’ खासदारांनी घेतली शपथ
- चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर
- छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे
- यवतमाळचे खासदार संजय देशमुख
- परभणीचे खासदार संजय जाधव
- नांदेडचे खासदार वसंत चव्हाण
- जालन्याचे खसदार कल्याण काळे
- दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे
- नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे
- पालघरचे खासदार हेमंत सावरा
- अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके
- भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे
- रायगडचे खासदार सुनिल तटकरे
- मावळचे खासदार श्रीरंग बारणे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम