Nashik News | शिक्षक दिनाच्या दिवशीच नाशिकच्या मालेगाव (Malegaon) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, यानुसार एका शाळेत मुख्याध्यापकांच्या संगनमताने शिक्षकाचा बोगस प्रताप समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील रावळगाव इंग्लिश स्कूल/ समाजश्री प्रशांत दादा हिरे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय रावळगाव या शाळेतील शिक्षक हा शाळेत काम न करता वेतन घेत असल्याचे उघडकीस आले आहे. तर, विशेष म्हणजे ही शाळा स्थानिक नेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांची असून, सदर शिक्षक हा माजी पंचायत समिती सदस्य असल्याची सुत्रांची माहिती आहे.
Nashik News | नेमकं प्रकरण काय..?
अधिक माहितीनुसार, मालेगावमधील रावळगाव इंग्लिश स्कूल/ समाजश्री प्रशांत दादा हिरे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय रावळगाव या शाळेत अरुण पाटील हे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. जून २०२३ पासून ते ३ जुलै २०२४ या काळात ते शाळेत येत नसूनही वेतन घेत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार प्रवीण पाटील यांनी चौकशीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पत्र पाठवले आणि शिक्षण उपसंचालकांनी चौकशी करण्यासाठी नंदुरबारच्या गटशिक्षणाधिकारी व पंचायत समितीला सांगितले.(Nashik News)
Malegaon | हिरे कुटुंबीयांचे हात बरबटलेलेच; काळ्या करणाम्यांची मालिका सुरूच
त्यानुसार नंदुरबार पंचायत समितीच्या पाच अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देत चौकशी केली असता, संबंधित उपशिक्षक हा काम न करता वेतन घेत असल्याचे निदर्शनास आले. या शिक्षकाचे शैक्षणिक वर्षात कोणत्याही दिवसाचे दैनिक टाचण नव्हते. पाटील यांनी शाळेत पर्यवेक्षक म्हणून काम केल्याचीही नोंद नसल्याचे चौकशी समितीला आढळून आले. तसेच संबंधित शिक्षकाने शिंदे नामक मान्यता नसलेल्या एका शिक्षकाची नेमणूक केल्याचेही चौकशीत आढळले.
या संपूर्ण प्रकारात शाळेचे मुख्याध्याक सहभागी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी योगी रामसुरत कुमार शिक्षण संस्था यांना कळवले असून, संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकावर वेतन वसूली आणि शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित संस्थेची, सदर शाळेच्या मुख्याध्यापकाची व बोगस शिक्षकाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून, या घटनेमुळे मालेगावसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News | फसवणुक केल्याप्रकरणी अपूर्व हिरेंविरोधात गुन्हा दाखल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम