Nashik News | नाशकात काँग्रेसचा भव्य मेळावा; पण मेळाव्यात एकुलत्या एक आमदारालाच स्थान नाही..?

0
72
Nashik News
Nashik News

Nashik News | नाशिक :  महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल..? काहीच सांगता येत नाही. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर अनेकजण आपल्या सोयीप्रमाणे पक्षांची अदलाबदल करताना दिसत आहेत. यातच आता नाशिकमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. नाशिकमधील सद्यस्थितीला विरोधी गटात असलेले एकमेव आमदार म्हणजे काँग्रेसचे इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना त्यांच्याच पक्षाने घरचा आहेर देत बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिसून आले.

Nashik News | नेमकं प्रकरण काय..?

राज्यात विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे आरोप केले जात असून, त्यात पाच आमदारांची नावं मध्यमांवर फिरत आहे. या पाच आमदारांमध्ये हिरामण खोसकर (Hiraman Khoskar)  यांचाही समावेश आहे. त्यांनी वारंवार आपल्यावरील आरोप खोडून काढत आपण क्रॉस वोटिंग केलेलं नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या फुटीर आमदारांना गाफील ठेऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे तिकीट कापा अशी कारवाई करण्याचे आदेश काँग्रेसच्या हायकमांडकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?

कारवाईचे संकेत मिळताच वादग्रस्त आमदारांची पळापळ 

त्यानंतर कारवाईचे संकेत मिळताच आमदार खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तर, आमदार झिशान सिद्दीकी हेदेखील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या रोड शोमध्ये झळकले होते. त्यामुळे हे वादग्रस्त आमदार लवकरच काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, आमदार हिरामण खोसकर यांचे भुजबळांसोबतही चांगले संबंध असून, अजित पवारांनीही एका भाषणात नाशिकच्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये आमदार हिरामण खोसकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे हिरामण खोसकर हे अनेक दिवसांपासून वादात आहेत.

एवढ्या मोठ्या मेळाव्यात जिल्ह्यातील एकमेव आमदारालाच स्थान नाही..? 

दरम्यान, आज नाशिकमध्ये काँग्रेसच्या (Congress) पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, यासाठी अवण्यात आलेल्या होर्डिंग्ज, बॅनरवर जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस आमदाराचाच फोटो नसल्याने काँग्रेसमधील अंतर्गत खदखद आणि गटबाजी  पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. (Nashik News)

तर, नाशिकमधील आजच्या या काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आजच्या या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांच्याबाबत काही निर्णय घेतला जाणार का? हे पहावे लागणार आहे.

Igatpuri Constituency | आमदार खोसकरांच्या अडचणीत वाढ; पक्षानंतर आता स्थानिकांनाही ‘ते’ नकोसे..?

हिरामण खोसकर आजच्या बैठकीसाठी अनुपस्थित राहणार..?

दरम्यान, यातच आणखी एक बातमी समोर आली असून, आजच्या बैठकीपूर्वीच हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाली आऊसण, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आमदार खोसकर हे आजच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी आणि बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, आज राज्यातील काँग्रेसचे सर्व बडे नेत हे नाशिकमध्ये येणार असल्याने ते उत्तर महाराष्ट्रातील आणि विशेषतः नगर, नाशिकमधील जागा आणि उमेदवारांची चाचपणी करू शकतात. (Nashik News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here