सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आपल्या मातीवर प्रेम करणारा डॉ. दौलतराव आहेर यांच्यासारखा विजिगिषू वृत्तीचा नेता पुन्हा होणे नाही, त्यांनी केलेल्या संस्कारांचा वारसा आज डॉ. राहुल आहेर पुढे चालवित आहेत, त्याच गोष्टींमुळे बाबा आज आपल्यात जिवंत आहेत असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते राहुलजी गिरी यांनी स्व. डॉ. दौलतरात आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ. दौलतराव आहेर यांचे ९वे पुण्यस्मरणानिमित्त कसमादे परीसर विकास मंडळाच्या वतीने व्याख्यान, तसेच तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘घे उंच भरारी’ ह्या विषयावर राहुलजी गिरी यांचे व्याख्यान संपन्न झाले.
आयुष शशीकांत भामरे (जनता विद्यालय पिंपळगाव) ह्या विद्यार्थ्याने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर होते. व्याख्याते राहुलजी गिरी, आमदार डॉ. राहुल आहेर, कसमादे परीसर विकास मंडळाचे सचिव कृष्णाजी बच्छाव, किशोर सुर्यवंशी पतसंस्थेचे संस्थापक प्रमोद पाटील, डॉ. वसंत आहेर, स्वप्निल अॅग्रोचे संचालक अरूण पवार, डॉ. रमणलाल सुराणा, पोपटराव पगार, प्रा. बी.के. रौंदळ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भगवान आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक कृष्णाजी बच्छाव यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी आपल्या मनोगतातून स्व. डॉ. आहेर यांनी कसमादेसाठी केलेल्या कार्याची माहीती दिली.
Deola | क्रीडा योग मार्गदर्शक सुनिल देवरे ‘युथ आयकॉनिक अवार्ड’ने सन्मानित
यावेळी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या आयुष शशीकांत भामरे (जनता विद्यालय पिंपळगाव ) ह्या विद्यार्थ्याने आपल्या वक्तृत्वाने सर्वांना प्रभावित केले. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारीतोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भगवान आहेर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कसमादे परीसर मंडळाचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे, भगवान आहेर, बि.के पाटील, उमेश देवरे, प्रशांत पवार, व्ही. एम. ठाकरे, डी. एम. आहेर, शुभांगी सावंत, हर्षद बच्छाव, सनी शिंदे, पद्म भूषण पगार, गायकवाड किशोर, उदय भामरे, मयूर ठाकरे, मनोज सोनवणे, सागर सोनवणे, समीर रौदळ, अशा वाघ, सारिका निकम, दीपाली बच्छाव, सोनाली पवार, चेतना आहेर आदींनी परीश्रम घेतले.
वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक –
१) आयुष शशिकांत भामरे – जनता विद्यालय, पिंपळगाव (वा.)
२) सुमित योगेश हिरे – जनता विद्यालय, विठेवाडी
३) अक्षदा अरुण सुर्यवंशी – जनता विद्यालय, लोहणेर
उत्तेजनार्थ –
१) संतोष प्रकाश जाधव – अनु. आश्रमशाळा, उमराणे
२) साक्षी मधुकर रौंदळ – जनता विद्यालय, खामखेडा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम