Deola | कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनावर व्याख्यान व प्रात्यक्षिक

0
13
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आपत्ती काळात घाबरून न जाता तत्परतेने अचूक निर्णय घेऊन उपाययोजना केल्यास आपत्तीतून स्वतःला व परिसरातील व्यक्तींना वाचवता येते परंतु त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य असणे जरुरीचे आहे. वाढती लोकसंख्या, जीवघेणी धावपळ यासाठी प्रत्येक नागरिकाला सुरक्षित राहायचे असेल तर त्यासाठी प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापनेचे प्रशिक्षण घेणे आवश्यकच आहे असे प्रा. योगेंद्र पाटील यांनी कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात बोलतांना सांगितले.

Deola | देवळा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट; वाखारी येथे दागिने, रोख रक्कम लंपास

भूकंप, पूर, आग, अपघात अशा घटना प्रसंगी आपण काय केले पाहिजे. यावर त्यांनी मार्गदर्शन करून प्रथमोपचारासाठी तसेच असेल त्या साधनासह आपण काय करावे याचे प्रात्यक्षिके करून दाखवलीत. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी जीवन हे अमूल्य असून त्याचा आनंद प्रत्येकाने उपभोगला पाहिजे त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण करून त्याचे पालन करा असे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रचार्य डॉ डी. के. आहेर यांनी केले. डॉ सतिश ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपप्रचार्य डॉ जयवंत भदाणे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here