Nashik | आ. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते विकास कामांचा उद्घाटन सोहळा

0
34
Nashik
Nashik

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | सिन्नर इगतपुरी विधानसभा मतदार संघातील इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद गटात आमदार माणिकराव कोकाटे यांचा विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा काल पार पडला.

यावेळी विविध गावांतील सभामंडप, रस्ते, विद्युत रोहित्र, सामाजिक सभागृह, हायमास्ट, काँक्रीट रस्ते, शाळा अंगणवाडी इमारत, पाणीपुरवठा योजना आदी विकासकामांच्या भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण सोहळ्या दरम्यान टाकेद गटातील निनावी ( 134 लाख रुपये ), अडसरे खुर्द(188 लाख रुपये ), टाकेद खुर्द( 16 लाख रुपये ),अधरवड( 222 लाख रुपये ), परदेशवाडी( 268 लाख रुपये ), इंदोरे( 140 लाख रुपये ), वासाळी( 319 लाख रुपये ), बारशिगवे – राहुल नगर ( 90 लाख रुपये ), सोनोशी 117 लाख रुपये ), टाकेद बु.शिरेवाडी ( 20 लाख रुपये ), अडसरे बु. ( 100 लक्ष ), भंडारदरावाडी 234 लक्ष )अश्या विविध गावांमध्ये आमदार माणिकराव कोकाटे यांनी निधी मंजूर करून आज या सर्व कामाचे उदघाटन लोकार्पण करण्यात आले.(Nashik)

Sarvteerth Taked | शेतकऱ्यांसाठी इकर्डा आणि बायफ संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र

Nashik | काय म्हणाले आमदार कोकाटे..

या वेळी आमदार कोकाटे यांचे भांडारदरावाडी येथे जेसीबी वरून ग्रामस्थांनी फुलाचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक गावांमध्ये बोलतांना आमदार माणिकराव कोकाटे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले गट तट न करता कोणताही जातीभेद न करता फक्त विकास कामे डोळ्यासमोर ठेऊन आम जनतेचे हित त्यांच्या समस्यांचे निर्मूलन कसे करता येईल याच उद्देशाने मी सर्वांचा आमदार म्हणून काम करत असतो तसेच मी जे काही काम हातात घेतो ते पूर्णच करत असतो आणि मला काम करण्याची छन्द आहे म्हणून तुम्ही मला जे काम सांगाल ते काम मी सुंदर आणि आवढाव्य च करत असतो तरी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद रुपी प्रेम माझ्यावर येणाऱ्या पुढील काळातही असुद्या जे ने करून मला ही विकासाची साखळी अशीच सुरु ठेवता येईल असे परखड मत आमदार कोकाटे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.(Nashik)

Sarvtirth taked : म्हैसवळण घाट रस्त्यासंदर्भात मनसेचे इगतपुरी तहसीलला निवेदन

महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसुबाई शिखर इंदोरे येथील रोप वे साठी २५० कोटी निधी,म्हैसवळण घाट मार्गे टाकेद येथून आंबेवाडी मार्गे जाणाऱ्या रस्त्यासाठी एक हजार कोटी निधी तसेच एम. जि. पी.योजनेअंतर्गत भाम धरणाचा उद्धभव घेऊन टाकेद गटातील सर्वच आदिवासी गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 25 कोटी रुपये निधी मंजूर असून काम युद्ध पातळीवर सुरु आहे तसेच आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी एक हजार कोटीं रुपयांचा निधी मंजूर असून ते काम लवकरच सुरु होईल तसेच रस्ते, वीज, पाणी विविध विकासभिमुख महत्वपूर्ण विकास कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.(Nashik)

टाकेद गटातील जवळपास 20 कोटींच्या कामांचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी उद्घाटन लोकार्पण केले. याप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प.सदस्य केरु खतेले, माजी जि.प.सदस्य सुनिल वाजे, सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, दौलत बांबळे, देवराम खेताडे, सरपंच अशोक गभाले, रतन पाटील जाधव, नामदेव भोसले, प्रभाकर हारक, योगेश घोटेकर, प्रभाकर गोडे, कमलाकर सांबरे, अरुण घोरपडे, राजाराम घोरपडे, साहेबराव झनकर नाबार्ड चे गोसावी साहेब, प्रकाश गोडे, गोरख मदगे, आमदार कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक संजय डावरे, शिवा वाणी आदींसह सर्व गावचे सरपंच तसेच परिसरातील माणिकराव कोकाटे यांचे कार्यकर्ते, तसेच परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Nashik)

“अप्पर कडवा धरणाच्या मोजणीला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून या धरणामुळे टाकेद गटातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.वीज पाणी आणि रस्ते या कामांसाठी मी कुठेही कमी पडणार नाही.”
– अँड. माणिकराव कोकाटे (आमदार सिन्नर विधानसभा)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here