Nashik Loksabha | दिग्गजांच्या तोफा नाशकात धडाडणार; याचा उमेदवारांना फायदा होणार..?

0
31
North Maharashtra
North Maharashtra

Nashik Loksabha | सुरूवातीपासूनच नाशिक आणि दिंडोरी लोकसभा चर्चेत राहिल्या आहेत. या दोन्ही लोकसभांसाठीचे मतदान हे २० मे रोजी शेवटच्या टप्प्यात होणार आहे. उमेदवारी जाहीर होण्यापासून या मतदार संघात ट्विस्ट पे ट्विस्ट बघायला मिळत आहे. या दोन्ही नाशिक मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे येथे महायुती आणि मविआ दोन्ही गटातून शिवसेनेचेच उमेदवार मैदानात उतरले आहे. शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या ही थेट लढत होणार आहे. (Nashik Loksabha)

तर, दिंडोरी लोकसभा मतदार संघात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी हॅट्रिक केली असून, मागील निवडणुकीत भारती पवारांनीही गड राखला होता. त्यामुळे हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, असे असले तरी कांदा प्रश्नामुळे यंदाची ही निवडणूक रंजक बनली आहे. मतदार संघात भारती पवारांच्या विरोधात नाराजीचे वातावरण असून, त्यांना अनेक ठिकाणी होणाऱ्या विरोधामुळे याचा प्रत्ययही आला आहे.

Bharti Pawar | गेल्या निवडणुकीत चव्हाणांनी ताकद लावली; आता त्यांनाच बाजूला केल्याने कोण तारणार..?

त्यामुळे या मतदार संघात भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्या थेट आणि चुरशीची लढत होणार आहे. एकूणच या मतदार संघात भारती पवारांची वाट कांदा प्रश्नामुळे काहीशी खडतर झाली असून, तसेच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांना पक्षातूनच आव्हान दिल्याने आणि अद्यापही त्यांचा अपेक्षित पाठिंबा व सहकार्य न मिळाल्याने पवारांसाठी हेदेखील एक आव्हान असणार आहे. एकूणच मतदार संघातील परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने थेट मोदींना मैदानात उतरवले आहे. (Nashik Loksabha)

तर, दुसरीकडे शरद पवार गटाचे या मतदार संघात चांगले वर्चस्व असल्याने त्यांनीही आपली ताकद पणाला लावली असून, आज वणी येथे भास्कर भगरेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची जाहीर सभा ठेवली आहे.

Nashik Loksabha | नाशिक लोकसभेचे दृश्य स्पष्ट होणार; करंजकरांसोबत किती नगरसेवक शिंदे गटात येणार..?

Nashik Loksabha | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा – 

वेळ – दुपारी १ वाजता

ठिकाण – नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, जोपूळ रोड, पिंपळगाव ता. निफाड

येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार असून, या सभेत पंतप्रधान मोदी कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांसोबत  संवाद साधण्याची शक्यता आहे. ते यावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांना कशी साद घालणार आणि याचा भारती पवारांच्या वोट बँकवर कसं परिणाम हे पहावे लागणार आहे. (Nashik Loksabha)

शरद पवारांची सभा – 

वेळ – संध्याकाळी ५ वाजता

ठिकाण – मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॉलेज, वणी दिंडोरी

येथे आज शरद पवारांची उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ सभा होणार असून, आधीच शेतकऱ्यांचा कौल ज्यांच्या बाजूने असल्याची चर्चा सुरू असताना अशात भगरेंसाठी ही सभा किती जीवनदायी ठरणार..? हे पहावे लागणार आहे. तसेच मोदींच्या टीकांना शरद पवार काय उत्तर देतात..? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Dindori | दिंडोरीत दोन सर अन् दोन तुतारी; योगायोग की राजकीय डाव..? 

उद्धव ठाकरे सभा – 

वेळ – संध्याकाळी ५ वाजता

ठिकाण – अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, त्र्यंबक रोड, नाशिक

उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होत असून, या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. करंजकर यांची नाराजी त्यांचा शिंदे गटात प्रवेश, हेमंत गोडसेंच्या उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेला उशीर, संजात राऊत यांनी शिंदेंवर केलेले पैसे वाटपाचे आरोप, महापालिकेतील घोटाळ्यांचे आरोप, मोदींची सभा यावर उद्धव ठाकरे काय बोलतात हे पहावे लागणार आहे.(Nashik Loksabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here